आ सोळंके चे वर्चस्व अबाधित
माजलगाव :
माजलगाव तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात ही पहिल्या टप्याप्रमाणे स्थानिक नाराजीमुळे बदलाचे वारे वाहिल्याचे दिवून आले. स्थानिक च्या प्रस्थापिताना चांगलीच पलटी बसली असली तरी अनेक ठिकाणी आ प्रकाश सोळंके समर्थकाचे दोन गट आपसात भिडले त्यामुळे विजयी गट आ सोळंके समर्थक असल्यामुळे आ सोळंके चे तालुक्यावरील वर्चस्व अबाधित असल्याचे दिसून आले. जरंगे यांच्याविषयीं च्या आ सोळंके नी केलेल्या वक्तव्यावरून चांगलेच वादंग उठले होते. मराठा समाज सोळंके वर नाराज असल्याचे बोलले जात होते त्यांचा बंगला पेटवून देण्यामागे हे तात्कालिक कारण असल्याचे ही सांगण्यात येत होते त्यांपरही अनेक ग्रामपंचायत आ सोळंके यांच्या ताब्यात आल्या आहेत.
नितीन नाईकनवरे यानी आपले गड राखले मात्र पंचायत समिती उपसभापती डॉ वसीम मनसबदार यांचा पात्रूड ग्रामपंचायत मध्ये पॅनल तिसऱ्या क्रमांकवर घासरला. जी प प सं चे स्वप्न पहाणाऱ्या अनेकांना आपली ग्रामपंचायत ताब्यात ठेवता आली नाही.
31 गावाचे निकाल हाती आले असून यामध्ये खालील गावात सरपंच पदासाठी विजयी झालेले उमेदवार. यात डूब्बा मजरा येथे नोटला २२५ मते सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे येथे सरपंच पदाची निवडणूक पुन्हा होण्याची शक्यता निर्माण झाली.
विजयी सरपंच व गावे खालील प्रमाणे …
निपाणी टाकळी – उषा भगवान राठोड
छोटेवाडी – संगीता अंगद कटके
मंगरूळ – छगन मेघा चव्हाण
सांडस चिंचोली – आशाबाई घोडे
खतगव्हाण – पायघन कमल आसाराम
बाराभाई तांडा – जनाबाई गुलाब जाधव
डूब्बामजरा – मतदारांनी नोटांचा वापर केल्याने या ठिकाणी उमेदवारांना नाकारले.
मंजरथ – भागवत मुगजी कोळेकर
साळेगाव – संगीता राठोड
लोणगाव – नारायण राऊत
खानापूर – पंडित आबुज
शिंदेवाडी वा. – शेषेकला प्रकाश वाघमारे
रिधोरी – गोपाळ तोर
काळेगावथडी – सुरेखा …. वक्ते
शिंदेवाडी पा. – निकिता उत्तरेश्वर पवार
फुले पिपंळगाव - राहुल फुलगे
सिमरी पारगाव -छगन कांबळे अनु जाती
घलाटवाडी -सुनिता येताळ अनु जाती
शेलापुरी -सौ संजीवनी तात्यासाहेब शेंडगे
चिंचगव्हाण राजेभाऊ सुध्दाम अर्जुन
तालखेड अंजली गुलाब मोरे
टाक्रवण - सुनील बाळासाहेब तौर
वरोळा - सुरेखा शरद पावर
कोथरूळ -बलराज कदम
वांगी अजय गुलाब जाधव
तेलगाव खुर्द -गणेश सौन्दर
पात्रड -लतीफ मोमीन
केसापुरी -भारत राजाभाऊ साबळे
भाटवडगाव - किशोर फुलसरे
सोमठाणा - बिस्मिल्लाह खान पठाण
डोक्यात हवा गेलेले गाव पुढारी जमिनीवर
मागील पाच -दहा वर्षा पासून ग्रामपंचायत ताब्यात असल्यामुळे अनेक गाव पुढऱ्याच्या डोक्यात गेलेली हवा मतदारांनी मतदानद्वारे काढली आता तरी हे गावपुढारी जमिनीवर येतील.
महसूल चे ढिसाळ नियोजन
मतमोजणी केंद्रावर महसूल प्रशसन व निवडणूक अधिकारी यांचे ढिसाळ नियोजन दिसून आले. प्रशस्नातील अनेक कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी चहा पाणी, नाश्ता -जेवणाचे कसलेच नियोजन दिसून आले नाही अनेक पोलिस कर्मचारी अधिकारी उपाशीच कर्तव्य बजावत असल्याचे दिसून आले.
Leave a comment