बीड,माजलगावमधील जाळपोळीत 11 कोटींच्या मालमत्तेचे नुकसान

बीड । वार्ताहर

मराठा आरक्षण आंदोलनाला सोमवारी (दि.30) बीड व माजलगाव शहरात हिंसक वळण लागले होते. या आंदोलनादरम्यान या दोन्ही शहरात लोकप्रतिनिधींच्या घरावर दगडफेक करत नंतर घरासह वाहने पेटवून देण्यात आली होती. या दोन्ही घटनेत तब्बल 11 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान याबाबतचा विस्तृत अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाकडून राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. दरम्यान बीड शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीत विविध ठिकाणी झालेल्या जाळपोळीच्या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

सोमवारी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ऑफिस, आ. संदीप क्षीरसागर यांचे घर, कुंडलिक खांडे यांचे ऑफिस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र  मस्के यांचे ऑफिस, बीआरएसचे दिलीप गोरे यांचे ऑफिस, धैर्यशील सोळंके यांचे घर यासह इतर ठिकाणी जाळपोळ करत दगडफेक करण्यात आली होती. याच प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे सोपवण्यात आला असून त्यांना पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे प्रमुख केतन राठोड हे अधिकारी पंकज कुमावत यांना मदत करणार आहेत तर बीड शहर ठाणे हद्दीतील गुन्ह्यांचा तपास शहर ठाणे निरीक्षक मुकूंद कुलकर्णी हे करणार आहेत.

आरोपींकडून वसुल करणार नुकसान भरपाई

या जाळपोळ व तोडफोक प्रकरणातील आरोपींकडून या मालमत्तेची नुकसान भरपाई करावी असे कळवले जाणार असून वेळप्रसंगी संबंधितांची मालमत्ता जप्त होवू शकते अशी माहिती जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

सीसीटिव्ही, व्हिडीओ, पाठवण्याचे आवाहन

 बीड शहरामध्ये झालेल्या जाळपोळ, दगडफेकीमध्ये 11 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून यातील आरोपींची धरपकड सुरु आहे. दरम्यान घटनेचे सीसीटिव्ही फुटेज, तसेच व्हिडीओ व फोटो असतील तर नागरिकांनी ते  9765151298 या व्हाट्सअप नंबरवर पाठवावेत असे आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संबंधिताचे नाव गुपित  ठेवण्यात येणार आहेत.

सात आरोपी अल्पवयीन

जाळपोळ-दगडफेक प्रकरणात पोलीसांकडून जिल्ह्यात 39 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून त्यात आणखी संख्या वाढत आहे. तुर्तास ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये 7 अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे तपासून समोर आले आहे.

दगडफेकीत चार पोलीस जखमी

माजलगाव येथे दगडफेकीदरम्यान सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील वाहनावर दगडफेक झाली होती. तसेच अप्पर अधीक्षक सचिन पांडकर आणि शिवाजीनगर पोलीसांच्या वाहनावरही दगडफेक झाली. यात एकूण 4 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.