राज्यभर मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला आहे. जरांगेंच्या उपोषणाचा सातवा दिवस असून आज पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संभाषणाबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना, जरागेंनी मुख्यमंत्र्यांचा निर्यण फेटाळून लावल आहे.
कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. पहिल्यांदा शेतीला कुणबी म्हणायचे. आता शेती सुधारित शब्द आलाय. या शब्दाला मराठे कमी लेखणार नाहीत. आम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार आहोत. यासाठी अभ्यासकांसोबत चर्चा करु असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
कोणी आत्महत्या करु नका. मी देखील लढतोय. मी लढून मरणाला घाबरत नाही. आता सगळीकडे शांततेत आंदोलन सुरु असल्याचे जरांगे म्हणाले.
तुम्ही कितीही कारणे दिली तरी आम्ही ऐकणार नाही. हा कायदा पारित करण्यासाठी समितीकडे पुरावे आहेत. हे एका पुराव्यावर होऊ शकतं. तुमच्याकडे भरपूर पुरावे आहेत, असे जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
आमचा व्यवसाय शेती आहे. 60 टक्के मराठा आरक्षणात गेला आहे. आम्ही थोडे राहिलो आहोत. ज्यांना प्रमाणपत्र घ्यायचं आहे ते घेतील. गोरगरीब मराठ्यांची मुलं कुणबी प्रमाणपत्र घेतील, असे जरांगे म्हणाले.
नेमका कोणता निर्णय?
चर्चा आरक्षणावर झाली. बाकी दुसरी काही झाली नाही. आपण त्यांना स्पष्ट सांगितलं की, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला तयार नाही. समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट अधिवेश देण्याचा निर्णय घ्या. विशेष अधिवेशन बोलवा. अर्धवट आरक्षण घेणार नाही. ते तुम्ही देऊ नका असं स्पष्ट शब्दात सांगितल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
आम्ही आमच्या अभ्यासकांची 12 ते 1 वाजता बैठक बोलावली असून वकिलांशी चर्चा करणार आहोत. पण 83 क्रमांकावर ओबीसीतील जाती मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हटलंय. 2004चा जीआर आहे तो दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारीत जाती निर्माण झाल्या आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. त्याच धर्तीवर आरक्षण द्या. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. तुम्ही कितीही बहाणे सांगितलं तरी ऐकणार नाही. ते आम्ही स्पष्ट सांगितलं आहे. सरसकट प्रमाणपत्र द्या. कायदा पारित करण्यासाठी पुरावा आहे. फक्त समितीला राज्याचा दर्जा द्यायचा असल्याचं जरांगे म्हणाले.
दरम्यान, एका पुराव्यावरही आरक्षण देऊ शकता. तुमच्याकडे भरपूर पुरावे असून व्यवसाय शेती असल्याने अडचण येत नाही. कुणाचं आरक्षण कमी होणार नाही. 60 टक्के समाज ओबीसीत आहे, आम्ही थोडे आहोत. ५ कोटी मराठा आरक्षणात येत नाही. आम्ही थोडे आहोत. मराठवाडा आणि इतर भागातील आहे. ज्यांना प्रमाणपत्र हवं ते घेतील. ज्यांना नको ते घेणार नाही. कुणावर जोरजबरदस्ती नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं.
मराठा समाजाला जरांगेंचे आवाहन
कालपासून मी पाणी पितोय, मी पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. पाण्यामुळे तब्येत चांगली झालीय, उठून बसलोय. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे.आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.
आमदार, खासदारांनी मुंबईतच राहा, राजीनामे थांबवा
राज्यात सुरू असलेल्या राजीनामा सत्रार मनोज जरांगेंनी भाष्य केले आहे. जरांगे म्हणाले, सर्वांनी मुंबईत जाऊन आवाज उठवा असे म्हटले होते. बहुतेक आमदार मुंबईकडे गेलेत, राजीनामा देण्याचं कळत नाही. सर्व आमदार खासदार मुंबईतच राहा. राजीनामा दिल्याने काय फायदा होतो कळत नाही पण सर्वांनी मुंबई सोडायची नाही.
बंदचा विचार तूर्तास करू नये
राज्यात मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्याविषयी देखील मनोज जरांगेनी वक्तव्य केले आहे. मराठा समाजाने संयम राखावा, थोडं टप्प्या टप्प्यात होऊ द्या, बंदचा विचार तूर्तास करू नये, असे देखील जरांगे यावेळी म्हणाले.
बस बंद करायला कोणी सांगितले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाची झळ राज्यभर जाणवू लागली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे.अनेक ठिकाणी बसच्या जाळपोळ झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना जरांगे म्हणाले, बस बंद करायला कोणी सांगितले. ST महामंडळवाले खूप घाबरतात. एसटीवाले खूप कलाकार आहेत. डोके आमचे फुटले आणि बस बंद होते
Leave a comment