आज पहाटे अडीच वाजताची घटना
आष्टी | वार्ताहर
आष्टीचे तहसीलदार यांच्या गाडीला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गाडीचे संपर्ण नुकसान झाले. ही आग कशाने लागली, को कोणी लावली याचे कारण अस्पष्ट असुन पोलीस तपास गतीने सुरू करण्यात आला आहे.
घटनास्थळी तहसीलदार गायकवाड, पोलीस निरीक्षक खेतमाळस,नगराध्यक्ष जिया बेग यांनी तातडीने धाव घेत अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली. यावेळी
नगराध्यक्ष जिया बेग यांनी पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.ही आग नेमकी कशी लागली की कोणी लावली या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
Leave a comment