बीड ः प्रतिनिधी
तुळजाभवानी माता, करवीर निवासिनी महालक्ष्मी माता, वणीची सपलश्रुगी माता, माहूर ची रेणुका माता तसेच माहेश्वरी समाज, जैन समाज, विप्र समाज, अग्रवाल समाज व सकल राजस्थानी समाजाच्या कुलदेवी यांचे नवरात्री च्या पावन दिवसात आपल्या शहरात दर्शन घेता यावे म्हणून बीड येथील श्री युवा माहेश्वरी सेवाभावी संस्थेच्या वतीने कुलदेवी व साडेतीन शक्तीपीठ दर्शन उपक्रम आयोजीत केला आहे.
शहरातील वृंदावन गार्डन येथे दि.15 ते 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 1 व सायंकाळी 4 ते 9 या दरम्यान ही दर्शनसेवा राहणार आहे.
या दर्शन सोहळ्याचे उद्घाटन रविवार दि.15 रोजी ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर, रामकृष्ण परमहंस प्रतिष्ठानचे समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रम जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थती लावावी असे आवाहन श्री युवा माहेश्वरी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पंकज धूत, सचिव अभिजीत दोडे, प्रोजेक्ट चेअरमन मयुर काबरा, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर युवराज चरखा,यांनी केले आहे.
Leave a comment