मांडवा गावातून निघाली जंगी मिरवणूक
आपल्या यशात आई वडील ,शिक्षक व गावकऱ्यांचा मोठा वाटा - अविनाश साबळे
आष्टी / प्रतिनिधी
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील बीडच्या सुपुत्राने सुवर्णमय कामगिरी केली आहे. अविनाश साबळेने आशियाई स्पर्धेत इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तर 500 मीटर स्पर्धेमध्ये सिल्वर पदक मिळवल्याने अविनाशच्या या यशामुळे भारतासाठी आणखी एका गोल्डमेडल सोबत सिल्वर मिडल ची देखील भर पडली आहे. त्यामुळे आष्टीचे नाव जगामध्ये अविनाशने गाजवला असून शाब्बास रे फाकड्या तू तर आष्टीचे नावच केल आहेस अशी प्रतिक्रिया क्रीडा विश्वातून व्यक्त होत आहे.
याबद्दल जिल्ह्याचे भूमिपुत्र अविनाश साबळे यांचा मांडवा ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी सत्कार करण्यात आला.
मांडवा ग्रामस्थांच्या वतीने जंगी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. गावातील नागरिकांनी माझा संघर्षाचा प्रवास बघितला आहे, माझ्या आयुष्यात माझ्या गावकऱ्यांचा शिक्षकांचा व माझ्या आई-वडिलांचा फार मोठा वाटा आहे. अभ्यासामध्ये पण अभ्यासासोबत खेळामध्ये देखील प्रगती मुलांनी करावी यासाठी पालकांनी लक्ष द्यावी अशी अविनाश साबळे यांनी बोलताना सांगितले.
स्वतःच्या मूळ मांडवा गावांतील ऑलिंपिक खेळाडू अविनाश साबळे यांचे मांडवा येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण धानोरा,कडा येथे घेतले होते त्यांच्या सत्काराचे जगी स्वागताचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते.अविनाश बोलताना म्हणाले की ऑलिंपिकचे एक काय अनेक पदके आपल्या देशाला मिळू शकतात. माझ्या खेळाचा सराव आणखी थांबवलेला नाही. २०२३ मध्ये मी गोल्ड मेडल व सिल्व्हर मेडल चीन मध्ये ऑलिंपिक स्पर्धेत जिंकलो मी रात्रं-दिवस सराव करत आहे. माझ्या गावच्या ग्रामस्थांनी जो सन्मान करून सत्कार केला त्यांचा मी मनापासून आभारी आहे.यावेळी सरपच सुभाष माळी,
उपसरपंच संतोष मुटकुळे,माजी सरपंच अशोक मुटकुळे,देवा धुमाळ, योगेश मुटकुळे,प्रा सुनिल मुटकुळे, तलाठी बाळासाहेब बनगे, प्रा डॉ बाबासाहेब मुटकुळे,विजय मुटकुळे, युवराज मुटकुळे,रावसाहेब मुटकुळे,अनिल मुटकुळे,भगवान श्रीखंडे,अश्वमेद मुटकुळे,योगेश कदम,धनेश मुटकुळे, ज्ञानदेव मुटकुळे,शरद पवार,योगेश मुटकुळे,सचिन मुटकुळे, शिक्षक सुनील तरटे, बाबासाहेब तावरे, दत्ता कदम, अविनाश कदम, जावेद पठाण, सचिन रानडे,अक्षय विधाते, अशोक मुटकुळे,श्रीधर मुटकुळे,लक्ष्मण वीर, अमृत मुटकुळे, आप्पा शिंदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment