बीड | वार्ताहर
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्यभरामध्ये 15 ऑगस्ट 2023 पासून राज्यातील संपूर्ण शासकीय रुग्णसेवेतील यंत्रणेमध्ये मोफत उपचार सेवा केल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये येणार्या रुग्णांचा फॉलोप मोठ्या संख्येने वाढला आहे. आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाच्या आवारामध्ये अस्थाव्यस्थेपणे दुचाकी चारकाची वाहनांची पार्किंग केल्या जात असल्याने रुग्णावाहिकांना अडथळा येत असल्याने जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका तथा रुग्ण घेवून येणार्या वाहनांविना इतर वाहनांना तसेच डॉक्टर, नर्स सह इतर कर्मचार्यांच्या वाहनांना ओळखपत्र असल्याशिवाय इंन्ट्री दिली जाणार नसल्याचे सक्तीचे आदेश काढण्यात आले आहे. यामुळे शनिवारीपासून जिल्हा रुग्णालयामध्ये खाजगी वाहनांना इंन्ट्री दिली जाणार नसल्याचे सांगितले गेले आहे.
मागील दिड महिन्यामध्ये जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यांची संख्या दुप्पट, तिप्पट झाली आहे. यामुळे डॉक्टरांसह इतर कर्मचार्यांवर अधिकचा ताणतणावामध्ये काम करत असतांना खाजगी वाहन चालकांंकडून रुग्णांना भेटण्यासाठी येणार्या नातेवाईकांकडून रुग्णालयाच्या अवारामध्ये अस्थाव्यस्थेपणे गाड्या पार्क केल्या जात असल्याने डॉक्टर, नर्स सह इतर कर्मचार्यांना कर्तव्यावर दाखल तारेवरची कसरत करत मार्ग शोधत पुढे जावे लागते. काही वेळा तर अतिदक्षतेखालील रुग्ण रुग्णवाहिकेमध्ये असतांनाही गाड्यांची अस्थाव्यस्थे पार्किंगमुळे रुग्णांलयात रुग्णवाहिका दाखल होवूनही वाहनांच्या पार्किंगमुळे वेळ लागतो. यामुळे रुग्ण घायाळ होण्याची दाट शक्यता नाकरली जाऊ शकत नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या सक्तीचे आदेश काढत जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांनाच्याही गाडी मध्ये आणण्यासाठी गेटवर ओळखपत्र दाखविल्याशिवाय गाडीसोबत इंन्ट्री दिली जाणार नसल्याचे सांगितले गेले आहे. यामुळे रुग्णालयामध्ये होणारी अस्थाव्यस्थे पार्किंगचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मेस्कोचे विशेष कमांडो राहणार तैनात
शासकीय रुग्णालयातील संपूर्ण आरोग्य सेवा मोफत केल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. रुग्णांबरोबर येणार्या नातेवाईकांकडून जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये अस्थाव्यस्थपणे गाड्यांची पार्किंग लावली जात असल्याने रुग्णवाहिकांना रस्ता राहत नाही. यामुळे शनिवारपासून जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर मेस्कोचे विशेष कमांडो तैनात ठेवत खाजगी वाहनांसह नातेवाईकांच्या वाहनांना सिव्हिलमध्ये इंन्ट्री दिली जाणार नसल्याचे सांगितले गेले आहे.
Leave a comment