राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज दुपारी चार वाजता सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच पवार यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु संघवी युक्तिवाद करणार आहेत.
दरम्यान, या सुनावणीपूर्वी शरद पवार हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजूर्न खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांना भेटणार आहेत. या भेटीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून महेश जेठमलानी, नीरज किशन कौर, मनिंदरसिंह हे बाजू लढवणार आहेत
अजित पवार यांनी ४० आमदार यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर सरकार मध्ये जाऊन सत्तेत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर अंत्रर्गत वाद निर्माण झाला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा करुन अजित पवार यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेतली व तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांनी सुध्दा निवडणूक आयोगाकडे आपले लेखी उत्तर सादर केले होते.
दरम्यान याप्रकरणी आज शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर पासून या प्रकरणी सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी हे नाव व घड्याळ हे पक्ष चिन्ह आता कुणाला मिळणार? याकडेच सर्व कार्यकर्ते व नेते व अन्य पक्षांचे नेते या सर्वांचे लक्ष लागले आहे.निवडणूक आयोगा पुढे शरद पवार यांच्या गटाच्या वतीने प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ वकील अभिषेक मनू सिंघवी हे तर अजित पवार गटाच्या वतीने नीरज कौल व मणिंदर सिंह हे वकिल बाजू मांडणार आहेत.शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगा समोर ९ हजार प्रतिज्ञापत्रे दाखल केले आहे तर अजित पवार गटाच्या वतीने ६ ते ७ हजार प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आले आहे.दरम्यान आज होणाऱ्या सुनावणी मध्ये निर्णय आमच्या बाजूने लागेल असा विश्वास अजित पवार गटाकडून व्यक्त केला जात आहे.तर दुसऱ्या बाजूला निकाल कहीही लागला तरी संभाव्य परिणामांची चिंता करण्याची गरज नाही.अशी आक्रमक भूमिका जेष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली आहे.काही लोकांचें निवडणूक चिन्ह बदलण्यांचे कारस्थान असू शकते.पण मतदार हे हुशार आहे.निवडणूक चिन्ह बदलले तरी कुठले बटण दाबायचे त्यांना ठाऊक असते असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतर अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला आहे. दोन्ही गटाकडून कागदपत्रे, पुरावे आयोगाकडे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह आमच्याकडे राहील – धनंजय मुंडे
लोकशाही मध्ये बहुसंख्य कोणाकडे आहेत हे पाहिलं जातं. पक्षातील बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी, दादांसोबत आहेत, मोठ्या संख्येने लोक दादांसोबत आहेत त्यामुळं पक्ष चोरणं या वर मला काही बोलायचं नाही. जयंत पाटील यांच्या टिकेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अशा शब्दात उत्तर दिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांना राष्ट्रवादीच्या जवळपास 40 आमदारांनी पाठिंबा दिल्याचा दावा केला जातोय. संबंधित प्रकरणी शरद पवार यांच्या गटाकडून जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली.
अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे पक्षबंदी कायद्यानुसार अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका जयंत पाटील यांनी दाखल केली. पण त्यांच्या या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली नाही. विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याने जयंत पाटील यांनी आता थेट सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं.
ठाकरे गटाने देखील हेच पाऊल उचललं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एक आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. तसेत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटाच्या याचिकेवर कोर्टात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Leave a comment