साथ, समर्थन आणि विश्वास ठेवा - माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

शिरूर/प्रतिनिधी

स्व.काकूंच्या राजकीय जीवनापासून तर जयदत्त अण्णांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. झालेली चूक मतदाराच आता दुरुस्त करतील असा विश्वास ह.भ.प.महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर यांनी व्यक्त केला तर आगामी काळात उत्तम साथ, खंबीर समर्थन आणि विश्वास ठेवा त्याला तडा जाऊ देणार नाही असे अभिवचन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले.


गुरूवार दि.05 रोजी शिरूर कासार येथे श्री गजानन नागरी सहकारी बँकेच्या आठव्या शाखेचा उद्घाटन सोहळा ह.भ.प.महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगड यांच्या शुभहस्ते तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी देविदास धस यांची प्रमुख उपस्थिती होती, कार्यक्रमाला शुभाशीर्वाद देण्यासाठी महंत विवेकानंद शास्त्री श्री 1008 महामंडलेश्वर त्रिवेंदानंद सरस्वती, महंत राधाताई महाराज सानप, महंत स्वामी जनार्दन महाराज, 108 वीरूपक्ष शिवाचार्य महाराज, महंत प्रल्हाद महाराज विघ्ने, महंत रामेश्वर महाराज शास्त्री, महंत श्रीरंग स्वामी महाराज, महंत अतुल महाराज शास्त्री, महंत यादव महाराज बडे, महंत भानुदास महाराज शास्त्री, महंत बाबासाहेब महाराज बडे, महंत हनुमंत महाराज शास्त्री, तसेच रोहित क्षीरसागर, विलास बडगे, दिनकर कदम, गंगाधर घुमरे, गणपत डोईफोडे, नानासाहेब काकडे, अरुण बोंगाने, जयदत्त थोटे, अशोक सवासे, वसंत काटे, कल्याण खांडे, शेख मैनूभाई, किसन बडे, विष्णुपंत सोनवणे, रमेश तळेकर, सुभाष क्षीरसागर, मुखीद लाला, शेख खाजा, कलंदर पठाण, रोहिदास पाटील गाडेकर, प्रकाश देसरडा, समृध्द जाधव, सभापती उषाताई सरवदे, सतीश काटे, सुधाकर मिसाळ, अर्जुन गाडेकर, बबनराव ढाकणे, फैयाज भाई शेख, मीनाताई उगलमुगले, जालिंदर सानप, अ‍ॅड.जयंत राख, अजिनाथ गवळी, भरत जाधव, संदीप ढाकणे, बाजीराव सानप, ज्ञानदेव बडे, बद्रीनाथ तांबे, निवृत्ती बेद्रे, अशोक मोरे, गणेश भांडेकर, सागर केदार, अक्षय रणखांब, जीवन डोळस, डॉ.प्रशांत सुळे, बाबुराव केदार, कल्याण तांबे, पांडुरंग अभंग, प्रकाश बडे, प्रकाश खेडकर, पोपट सिरसाट, शेख बिबन, सुलेमान पठाण, आयुब तांबोळी, प्रभाकर सानप, संजय सानप, गणेश घोलप, बप्पासाहेब खेडकर, दिलीप उगले, पंढरीनाथ उगले, शाहूरव भोसले, शेषराव आरेकर व पत्रकार आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी बोलताना ह.भ.प.महंत विठ्ठल महाराज म्हणाले की, अडचणीच्या काळात धावून येणारा नेता म्हणजे जयदत्त आण्णा आहेत. आज त्यांनी सर्वसामान्यांचे अर्थकारण लक्षात घेऊन या ठिकाणी गजानन बँकेच्या आठव्या शाखेचा शुभारंभ केला आहे. काकूंचा आणि अण्णांचा सगळा राजकीय प्रवास मी पाहिला आहे, जिल्ह्यातील सर्व समाजाशी त्यांचे जवळचे संबंध असल्यामुळे समाजाशी नाळ जोडला गेलेला हा नेता आहे. झालेली चूक भविष्यात दुरुस्त होईलच आणि अण्णा पुन्हा एकदा आपल्या राजकीय यशाची पायरी चढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, या नवीन उपक्रमास आशीर्वाद देण्यासाठी आज संत महंतांची उपस्थिती लाभली आहे. येतानाच विघ्नहर्त्याचे आशीर्वाद घेऊनच आलो आहे. आज सामान्यांच्या अर्थकारणाची पूर्तता व्हावी यासाठी शिरूर शहरात गजानन बँकेच्या आठव्या शाखेची सुरुवात करत आहोत. शिरूर तालुक्यातून मला राजकीय पाठिंबा मोठा मिळाला आहे, बँक आणि खातेदारांच्या मध्ये विश्वास मोठा असतो आजपर्यंत गजानन बँकेचा प्रवास हा केवळ खातेदारांच्या विश्वासावरच क्रमांक एक वर राहिला आहे. त्यामुळे बँकेला आतापर्यंत सहा मोठे पुरस्कार मिळाले आहेत, भविष्यात लवकरच संभाजीनगर आणि पिंपळनेर अशा दोन शाखा सुरू करत आहोत. आम्ही केवळ सामान्यांचा विश्वास या माध्यमातून संपादित करत आहोत, गुणवत्तेच्या बाबतीत बीड जिल्हा कमी नाही जवळच असलेल्या आष्टी तालुक्यातील अविनाश साबळे या तरुणाने आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे त्याचबरोबर एम.पी.एस.सी. सारख्या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थी राज्यात सर्वात पुढे आहेत. ऊसतोड मजुरांचा जिल्हा नव्हे तर गुणवंतांचा जिल्हा म्हणून आता ओळख निर्माण होऊ लागली आहे. सिंदफणा नदीची उंची, 33 के.व्ही. केंद्र, साठवण तलाव आणि अखंड वीज मिळणे हे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहेत. नवगण राजुरी ते खरवंडी आणि राजुरी ते पाथर्डी असे 180 आणि 140 कोटी रुपयांचे रस्ते आता पूर्ण होत आहेत, जे की आपण आपल्या कार्यकाळात जाणीवपूर्वक मंजूर करून घेतले होते. काकूंचा वसा आणि वारसा सामर्थ्याने पुढे नेण्याचा पण केला आहे, माझ्या प्रत्येक उपक्रमाला संतांचे आशीर्वाद मिळतात जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे, तलाव कोरडे पडू लागले आहेत, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होत आहे अशा परिस्थितीत शासन दरबारी पाठपुरावा करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम यापुढे करायचे आहे असे सांगून त्यांनी सुरू झालेल्या बँक शाखेत ग्रामस्थांनी खाते उघडून व्यवहार सुरू करावेत असे आवाहन केले.


यावेळी बोलताना देविदास धस म्हणाले की, बीड मतदार संघात आणि बीड जिल्ह्यात विकासाशी आणि सामान्यांशी जोडला गेलेला नेता म्हणून पाहिले जाते. आगामी काळात पुन्हा तीच चूक होऊ देऊ नका सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला माणूस हवा असतो म्हणूनच जयदत्त अण्णांनी राजकारणाबरोबरच अर्थकारण मजबूत व्हावे यासाठी ही सेवा सुरू केली आहे त्याचा उपयोग करून घ्या, देवाण-घेवाण विश्वासाने जिथे होते तिथेच व्यवहार उत्तम राहतात असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे यांनी केले. याप्रसंगी शेख जलील, अरुण गोरे, सतीश तांगडे, दत्तात्रय डोईफोडे, आदेश नहार, राजेंद्र मुनोत, अर्जुन बहिरवाळ, शरद ढाकणे, अरुण डाके, सुभाष क्षीरसागर, शैलजा आघाव यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मानूर ग्रामपंचायत तर्फे आणि परिसरातील गावकर्‍यांच्या वतीने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे स्वागत करण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.