स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी शुक्रवार पर्यंत नावनोंदणी करावी - राजेंद्र मोटे
गेवराई
गौरी गणपती उत्सवानिमित्त महिलांचा व युवकांचा आंनद द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व माॅं संतोषी अर्बन परिवाराच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दि.23 रोजी भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्यासाठी शुक्रवार दि.22 ही अंतिम तारीख असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त महिला व युवकांनी नावनोंदणी करावी असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे नवनिर्माण गणेश मंडळ अध्यक्ष विकास वानखेडे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात गौरी गणपतीचा सन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. गौरी व गणपती हा प्रत्येकाच्या घराघरात बसविण्यात येतो गौरी ची स्थापना तीन दिवस व गणपती हे दहा दिवस बसविण्यात येतो. या दरम्यान आपल्या घरातील गौरी गणपती आकर्षक दिसावा यासाठी त्यांच्या समोर अनेक सजावट व देखावे करण्यात येते. या सनाचा आंनद अनखी द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व माॅं संतोषी अर्बन परिवाराच्या संयुक्त विद्यमाने भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करुन बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली जात आहे. याचे प्रायोजक माॅं संतोषी अर्बन, हाॅटेल अदिती व सोनाई एजन्सी हे असून या स्पर्धेचे परीक्षण शनिवार दि.23 रोजी दुपारी 2 पासून सुरू होईल. या स्पर्धेची नावनोंदणी करण्यासाठी शुक्रवार दि.22 ही अंतिम तारीख असून या स्पर्धेत चार बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला फ्रीज व सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांक मिळवणाऱ्याला कुलर व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाला मिक्सर व सन्मानचिन्ह तर उत्तेजनार्थ पारितोषिक इस्त्री व सन्मानचिन्ह असे असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9604535373, 8668926597, 9881446457 व 9665602101 या नंबरशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त महिला व युवकांनी शुक्रवार पर्यंत आपली नावनोंदणी करावी असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे नवनिर्माण गणेश मंडळ चे अध्यक्ष विकास वानखेडे यांनी केले आहे.
Leave a comment