अंबाजोगाई | वार्ताहर
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त, मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दूर्मिळ अशा छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन माहिती प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शरद झाडके, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर पवार, तहसिलदार विलास तरंगे, गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे-काळे, तालूका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रदर्शनात मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, दूर्मिळ अशा चित्र स्वरूपात प्रदर्शित करण्यात आल्या. यात १८५७ ते १९४७ या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा चित्र आणि माहिती स्वरुपात माडण्यात आली आहे. या वेळी पारंपरिक वेशभूषेत देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Leave a comment