कारवाईत अवैध दारू, रसायन दोन घोडे घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड | वार्ताहर
अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत कुरणवाडी शिवारात वाणा नदी पात्रात अवैध गावठी दारू तयार करून नंतर त्या दारूची घोड्यावर वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत गावठी दारू व रसायन अड्डा उध्वस्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत 15 सप्टेंबर रोजी अवैध धंद्याची माहिती काढली जात होती. याचवेळी कुरणवाडी शिवारातील वाण नदीपात्रात गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पो.नि. साबळे यांना मिळाली त्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक सुतळे व एलसीबीच्या पथकाला कुरणवाडी शिवारातील पात्रात जाऊन कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.
पोलिसांनी तिथे जाऊन अवैध गावठी दारूच्या दोन ठिकाणी छापा मारत गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. यावेळी घोड्यावर गावठी दारू तयार दारू वाहतूक करणाऱ्या चाँद लाला रेगीवाले व काळू मदार मुन्नीवाले (दोघे रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात दारूबंदी अंतर्गत व प्राणी छळ अधिनियम 1960 अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आला. या कारवाईत अवैध दारू, रसायन व दोन घोडे सा एकूण 1 लाख 47 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर,अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोह. रामदास तांदळे, देविदास जमदाडे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाय, राजू पठाण, बप्पासाहेब घोडके, अतुल हराळे यांनी केली.
Leave a comment