कुंभार पिंपळगाव / वार्ताहर
बैल पोळा सणानिमित्ताने बाजारपेठा सजलेल्या आहेत. परंतु दुष्काळाने महागाईचे सावट असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठांकडे पाठ फिरवलेल्याचे दिसून येत आहे. गेल्या दाेन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके करपून गेली. तर जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. पीक उगवल्यानंतर महागडी औषधे फवारली. त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी होणाऱ्या प्रत्येक सणाला पाठ फिरवण्यातच आपली भूमिका घेतल्याली दिसत आहे.बैलांच्या साज खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. बाजारपेठांमध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पाणीटंचाई असल्यामुळे बैलांना धुण्यासाठीही पाणी नाही. दुष्काळाचे सावट असताना पाेळा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित हाेत आहे.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे दि.१३ सप्टेंबर बुधवार रोजी बैलपोळा सणानिमित्त बैलांच्या साज घांगरमाळ,घाटीजोड,घोगरजोड,झुला बांशिगजोड,वेसन,मोरखी ,कासरा आदी साहित्यांच्या दुकाना आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात थाटल्या होत्या. परंतु यंदा पाऊस नसल्यामुळे बैलपोळा सणावर मंदीचे सावट दिसून आले. पोळा आणि पाऊस झाला भोळा अशी जुनी म्हण आहे. पोळा झाल्यावर पाऊस भोळा होतो असे म्हणतात. यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. कोरडवाहूची पिके गेल्यात जमा आहेत..
शेतकरी पाऊस नसल्यामुळे चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये पोळा सन निरूउत्साह आहे .शेतकऱ्यांचा राजा सर्जा-राजा खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतकरी मालकासोबत राब-राब राबूऊन काबाड कष्ट मेहनतीकाम करणाऱ्या सर्जा राजाचा सण कोरडाच साजरा होत आहे . पिकांची परिस्थिती बेताचीच असल्याने यंदा दुष्काळच आहे.त्यामुळे बैलपोळा सणाच्या आठवडी बाजारात साज साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी नव्हती.बाजारात बैलपोळा सणानिमित्त साज साहित्य खरेदीवर दुष्काळाचे सावट दिसून आले.
Leave a comment