तीन दूध नमुने तपासणीसाठी पाठवले प्रयोगशाळेत
बीड | वार्ताहर
आष्टी तालुक्यातील कडा येथील कानिफनाथ दूध संकलन केंद्राची अन्न औषध प्रशासन आणि जिल्हा दूध भेसळ समितीच्या वतीने आज 13 सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने संशयाच्या आधारे २४८ लिटर गायीचे दूध नष्ट करण्यात आले. या दुधाची किंमत ८ हजार ४३२ रुपये आहे.
तपासणी दरम्यान काढलेले ३ नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले व पुढील कारवाई नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर करण्यात येईल. ही कारवाई अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन अजित मैत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गायकवाड, सहायक मुख्तार शेख, एस.ए.वैधमापक, सोनवणे झेड.के. विस्तार अधिकारी व पोलिस भावले यांनी केली.
Leave a comment