सहा.अधिक्षक पंकज कुमावत यांची कारवाई एका आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
बीड | वार्ताहर
चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील बोगस पारगाव (ता. शिरूर) येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने मोठी कारवाई केली. या ठिकाणी छापा मारून पोलिसांनी तब्बल 27 लाख 27 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या परिसरात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान यापूर्वी काही वर्षांपूर्वी शिरसाळा पोलीस ठाणे हद्दीतील मोहा परिसरात अशाच पद्धतीने गांजाची शेती काहीजणांनी फुलवली होती. त्या प्रकरणात केलेली कारवाई सबंध राज्यभरात गाजली होती. त्याची आठवण आजच्या कारवाईने ताजी झाली आहे.
घोगसपारगाव (ता. शिरुर) येथे संभाजी कराड याने त्याच्या स्वत:च्या मालकीचे शेतामध्ये बेकायदेशिररित्या गांज्याची लागवड केली असल्याची माहिती सहायक अधिकक्ष पंकज कुमावत यांना मिळाली होती. सदर माहिती श्री. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक साहेब, बीड यांना देण्यात आली. नंतर पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहा. अधिक्षक पंकज कुमावत, डीवायएसपी निरज राजगुरु, प्रो. पोलीस उपअधिक्षक, खाडे, सपोनि एकशिंदे, पोउपनि इंगळे, पोउपनि तांगळे, पोउपनि राजेश पाटील, पोउपनि आनंद शिंदे, पोह येळे, खेळकर, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस अंमलदार संतोष गित्ते यांचे टिमने घोगसपारगाव येथे सदर शेतामध्ये छापा मारला असता एकुण 554 कि. ग्रॅ. गांजा ज्याची किंमत 27 लाख 27 हजार 700 रुपये लागवड केलेला मिळुन आला. आरोपी संभाजी हरीभाऊ कराड (वय 37, रा. घोगसपारगाव ता.शिरुर) यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोउपनि राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment