बीड | वार्ताहर
चौसाळा जिल्हा परिषद गटाचे सदस्य अशोक लोढा यांच्या हस्ते बीड तालुक्यातील लोणी घाट येथे 11 सप्टेंबर रोजी विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी जिल्हा नियोजन अंतर्गत प्राथमिक शाळा खोल्यांचे बांधकाम, वृक्षारोपण, दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता लोकार्पण सोहळा पार पडला तसेच सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत अंतर्गत 15 वित्त आयोगातून झालेले कामाचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य अशोकसेठ लोढा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मारुती जाधव, उपसरपंच लक्ष्मण जाधव, ग्रामपंचायत सदस्य राम जाधव, तुळशीराम जाधव, प्रभाकर जाधव, जयसिंग जाधव, नारायण जाधव, लहु सातपुते, रामु काका शिंदे, बाबुराव जाधव, गोविंद जाधव, तसेच समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
Leave a comment