सर्वपक्षीय बैठकीत नेमका काय निर्णय झाला?
जालना येथे लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई होणार. लाठीचार्ज प्रकरणी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेय. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार. जवळपास सर्व मागण्या सरकाराने मान्य केल्या आहेत. कुणाचेही आरक्षण कमी करुन मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार नाही. मराठा आरक्षण टिकेल याची काळजी सरकार घेणार. मनोज जरांगे यांनी सरकारने गठित केलेल्या समितीला निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांचा वेळ द्यावा. याकरिता जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी तातडीने उपोषण मागे घ्यावं तसच मराठा आरक्षणासंदर्भात एक समिती गठीत करून त्याचं नेतृत्त्व अजित पवारांनी करावं असा ठराव आजच्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आलाय. गेल्या अडीच तासांपासून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत खल सुरू आहे. या बैठकीत जरांगे-पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं हीच राज्यसरकारची भूमिका असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.
सर्वपक्षीय नेत्याची नुकतीच सह्याद्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधारी नेत्यांसह विजय वड्डेटीवार, अंबादास दानवे, छत्रपती संभाजीराजे भोसले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब आदी नेते उपस्थित होते. तब्बल दोन तास सह्याद्रीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पाक पडली. या बैठकीत नेमके काय निर्णय झाले, याची माहिती आता मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं, असा ठराव बैठकीत झाला आहे. या ठरावाला सर्वपक्षीयांची अनुमती होती.तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची सरकारला चिंता आहे. त्यामुळे माजी न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या कमिटीला वेळ द्यावा अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील याच्याकडे केली. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासंदर्भातील आदेश पोलिसांना दिला आहे. याचसोबत तीन दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत बैठकीत एकमत झाले आहे. सुप्रीम कोर्टात रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळालं पाहिजे. कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे,अशी सरकारची भूमिका असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याचसोबत तज्ञ मंडळींसोबत चर्चा, टास्क फोर्स तयार करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या त्रुटीवर काम करणे, मराठा समाज मागास कसा आहे, सामाजिक आणि शैक्षणिक सिद्ध करणे या सर्व बाबींवर बैठकीत चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या लढाईतले दोन म्होरके नेते अनुपस्थित
मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या या सर्वपक्षीय बैठकीला मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अनुपस्थित राहीले. तसेच या उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाणही या बैठकीला अनुपस्थित राहीले. आजी-माजी अध्यक्ष अनुपस्थित असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेते हे मराठा आरक्षणाच्या लढाईतील म्होरके आहेत. पण तेच या महत्त्वाच्या बैठकीत अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलंय.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात ईथेच
Leave a comment