अजितदादांचा स्वभाव म्हणजे मेे जो बोलता हु वो करके
दिखाता हु और मे नही बोलता हू डेफिनेटली करता हु’
धनंजय मुंंडेंकडून अजितदादांच्या कार्यशैलीचे कौतूक
बीड । वार्ताहर
मला अनेक जणांनी विचारलं, की बीड जिल्ह्यातील तुमची ही सभा 17 तारखेला झालेल्या सभेेचं उत्तर आहे का? मी नम्रपणेे सर्व पत्रकारांना, सर्व सहकार्यांना, माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगीतले की, 27 तारखेची ही दादांची सभा 17 तारखेच्या उत्तराची नाही तर बीड जिल्ह्यातील माय-बाप जनतेची सेवा करण्याच्या उत्तरदायित्वाची आहे. आपल्यापैकी किती जणांना उत्तरदायित्व काय हे कळालं असा सवाल करत उत्तरदायित्व काय हे 17 तारखेच्या सभेत सांगितलं की, या जिल्ह्याने आदरणीय साहेबांवर फार प्रेम केलं. प्रेम केलं पण त्या प्रेमाच्या पोटी या जिल्ह्याला साहेबांनी काय दिले, हे प्रश्नचिन्ह आहे. पण साहेबांचं उत्तदायित्व विकासाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला आजपर्यंत अजितदादांनी दिले म्हणून ही सभा उत्तराची नाही तर उत्तरदायित्वाची आहे अशा शब्दात कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी रोखठोक भूमिका मांडली. अजितदादांनी बीड जिल्ह्यातील अपेक्षा पूर्ण केल्या म्हणूनच अजितदादा तुम्हाला ‘एकच वादा अजित दादा’ उगचं म्हणत नाही. तसेच ‘ मेे जो बोलता हु वो करके दिखाता हु औ मे नही बोलता हू डेफिनेटली करता हु’ असा स्वभाव दादांचा आहे असे सांगत धनंजय मुंंडेंकडून अजितदादांचे कौतूक करण्यात आले.
बीडमध्ये आज 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित उत्तरदायित्व सभेत ते बोलत होते.‘लाखोंच्या संख्येने उपस्थित माय-बाप जनतेपुढे नतमस्तक होतो’असे सांगत भाषणाची सुरुवात करत कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणालेे, ही सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायम मिटवण्याची ही सभा आहे. यासाठीच तर तुम्ही सर्व जण आला आहात ना? अशी विचारणा मुंडेंनी केली. त्याला उपस्थितांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कार्यशैलीचे कौतूक करताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, दादा बीड जिल्ह्यातील जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यातील अनेक अपेक्षा आपण पुर्ण केल्या म्हणूनच अजितदादा तुम्हाला ‘एकच वादा अजित दादा’ उगचं म्हणत नाही. तसेच अजितदादा, एखाद्या सिनेमाच्या डॉयलॉगमध्ये आपले वर्णन करायचे झाल्यास ‘ मेे जो बोलता हु वो करके दिखाता हु, और जब मे नही बोलता हू डेफिनेटली करता हु’ असा स्वभाव दादांचा आहे. म्हणून बीड जिल्ह्याच्या जनतेला ‘विकासाचा वादा’ दादांनी करावा हीच मागणी जिल्ह्यातील जनतेची असल्याचे धनंजय मुंडेेंनी स्पष्ट केेली.
ते पुढे म्हणाले, दादा मी तुमचे आभार मानतो. दादा गोदावरी नदीवर तुम्ही बॅरिझेस उभे केले.त्यामुळे जिथे कुसळ पिकत नव्हतं तिथं आता ऊस पीकतोय. ज्या बीड जिल्ह्यात कापूस उगवायची मनगटात ताकद आहे, त्याच बीड जिल्ह्यात डोंगराळ भागात पाणी नसल्याने वर्षातून एकच पीक घ्यावे लागते म्हणून आमच्या बीड जिल्ह्यातील माय-बाप जनता जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी ऊसतोडीसाठी जाते. तिथे सुध्दा मनगटाची ताकद लागते. त्या ऊसतोड मजुरांसाठी स्व.गोपीनाथ मुंडेंच्या नावाने अनेकदा महामंडळ निघाली, पण दादा तुम्ही निर्णय करेपर्यंत ती महामंडळ फक्त नावापुरती होती. मी विनंती केली आणि तुम्ही खर्या अर्थाने ऊसतोड मजुराचे अथक परिश्रम आपल्या डोळ्याने पाहिले आणि पहिल्यांदा राज्याचे अर्थ मंत्री झाल्यानंतर अर्थसंकल्प मांडताना स्व.गोपीनाथ रावमुंडे ऊसतोड कल्याण महामंडळ काढले. नुसते काढले नाही तर या महाराष्ट्रात एक टन ऊस गाळप झाला तर 10 रुपये ऊसतोड मजुराच्या कल्याणासाठी जाणार हा निर्णय अजितदादांनी केला म्हणून बीड जिल्हा तुमचे उपकार कधीही विसरु शकणार नाही. शिवाय राज्य सरकार 10 रुपये देणार असा निर्णय झाला. बीड जिल्ह्याचे आता अनेक प्रश्न आहेत, ते आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देवून तसेच जे पूर्वी सोबत होते त्यांच्या विनंतीला मान देवून जे-जे काही केलयं ते बीड जिल्ह्यासाठी अजितदादांनी केले असे ते म्हणाले. अजितदादांनी मनात आणले तर जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा मिटू शकतो. त्यामुळे फक्त धरणात पाणी आणण्यासाठी जे काही करता येईल ते करा, त्यासाठी तिजोरी थोडी सांद सोडून यासाठी वापरली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. अनेक अपेक्षा आणि मागण्या आहेत. मात्र आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील जनतेची सेवा करत राहणार आहे. जिनोने कोशिश की मुझे मिठ्ठी मेै मिलाने की, लेकिन मै बीज हु, आदत है मी बार बार उगने की, असेही मुंडे म्हणाले.
संघर्ष करत प्रश्न सोडवायचे हा माझा इतिहास
अजितदादांचे माझ्यावर उपकार;त्यांचे नेतृत्व स्विकारले तर चुकले कुठे?
कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मला एक खंत कायम वाटते. आपल्या इमानदारीने प्रत्येकाने सांगावे की धनंजय मुंडेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? नाही. 17 तारखेच्या पुर्वीला माझ्यावरती माझा इतिहास विचारला. आणि सांगितलं की, या जिल्ह्यातील मंत्र्यांने तो इतिहास जिल्ह्यातील जनतेला सांगावा. मात्र माझ्यासाठी शरद पवार देव आहेत आणि देवाचे आदेश पालन करणे आवश्यक आहे. माझा इतिहास हा आहे की, 2010 मध्ये मला भाजपमधून काढले विधानपरिषद निवडणूकीत मला निवडून येण्यासाठी 2 मते आवश्यक होती ती दादांनी मिळवून दिली, हा उपकार ही मदत मी का विसरावी. आणि मग मी दादांचे नेतृत्व स्विकारले तर मी चूक केली का? स्व.मुंडे साहेबांच्या हाताला धरुन बीड जिल्ह्यात मी संघर्ष केला. कधीही डगमगलो नाही. मुंडे साहेबांकडून संघर्ष शिकलो. दादा आणि साहेबांकडून प्रश्न कसे सोडवायचे हे शिकलो, हा माझा इतिहास आहे. विधानपरिषदेवर निवडून आल्यानंतर 2014 पासून 2019 पर्यंत राष्ट्रवादीने सर्वाधिक संघर्ष केेला हे लोक माझा सांगाती मध्ये माझ्या दैवताने म्हणजेच शरद पवारांनी सांगितले हा माझा इतिहास आहे.
सवाल इस बात का है की, ये पत्तर कहाँ से आया है?
‘सवाल इस बात का नही की, शिशा बचा हैै की तुटा है, सवाल ये है की ये पत्तर कहाँ से आया है? असे सांगत मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मध्ये 2 जुलै रोजी जे काही झाले त्याचे एका वाक्यात उल्लेख करायचा झाला तर ‘सवाल इस बात का नही की, शिशा बचा हैै की तुटा है, सवाल इस बात का है की, ये पत्तर कहाँ से आया है? आता याला संदर्भ जोडायचा झाला तर, शरद पवारांनीच 2014 मध्ये विधानसभेचा पुर्ण निकाल लागायच्या आधीच भाजपाला बाहेरुन पाठींबा दिला. मग प्रश्न आहे,पत्तर कहाँ से आया हेै? असे सांगत मुंडे म्हणाले 2019 काय झाले मला माहित नाही, कारण पहाटं उठायची सवय मला नाही. हा इतिहास सर्वांना माहित आहे. म्
आजच्या सभेने रेकॉर्ड मोडले
आज मी आपल्याला सांगतो, मी पहिल्यांदा असे अनेक कार्यक्रम घेतले. स्व.अटलची, अडवाणींजी, स्व.मुंडेंजीच्या सभा घेतल्या, मात्र या सर्व सभेचे रेकॉर्ड दादा आज तुमच्या प्रेमापोटी बीड जिल्ह्यातील जनतेने मोडले आहेत. संघर्ष माझ्या पाचवीला पुजलाय. आज मंत्री आहे. अनेक अडचणी आहेत. मी अडचणी समोर मांडणार नाही. शेतकर्यांच्या पोराला तुम्ही कृषी खाते दिले ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचे वचन देतो असे मुंडे आपल्या भाषणात म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांवर टिका
ज्यांना संतश्रेेष्ठ भगवानबाबांच्या गडाचा पायथा सुध्दा माहित नाही, ज्यांना गहिनीनाथ गडाचा पायथा माहित नाही, ते इथे येवून म्हणाले की, मी भगवानगडाचा लेक आहे. तो म्हणण्याचा सर्वांना अधिकार आहे, पण ‘मी पण वंजारी आहे’ हे साहेबांसमोर म्हणायची काय गरज होती असे सांगत नाव न घेता आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंडेंनी टिका केली.
Leave a comment