बीड । वार्ताहर
अजितदादा आता बीड जिल्ह्याची बारामती करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे अशी मागणी माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली.
बीड येथे आज आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तरदायित्व सभेत ते बोलत होते. आ.प्रकाश सोेळंके म्हणाले, गोदावरीचे पाणी आणले तर मराठवााड्याची तहान भागेल या साठीच्या योजनेसाठी दिड लाख कोटी रुपये या योजनेसाठी लागतील मात्र ही योजना पुर्ण झाली पाहिजे. कारण राज्यात आता समृध्दी महामार्ग झाला इतर योजनाही मार्गी लागल्या. अजितदादांनी या योजनेबाबत जर लक्ष घातले तर ही योजना मार्गी लागेल.
आज महाराष्ट्रात शेतीसाठी वीजेचा प्रश्न कायम आहे. बीड जिल्ह्यात 3 ते 4 तासापेक्षा जास्त विज मिळत नाही. आता आरडीडीएसच्या योजनेत बीड जिल्ह्यात 1200 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यात आणखी 500 कोटींची भर घालावी. तेेलंगणा मोफत वीज शेतकर्यांना देत असताना महाराष्ट्र शासन मात्र शेतकर्यांकडून वीज बील आकारते. मराठवाड्यातील शेतकर्यांना मोफत वीज द्यावी. बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे. चाकण, पिंप्री चिचवड, पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात आमचा तरुण जातो. त्यामुळे या ठिकाणी पंचतारांकित एमआयडीसी होणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाचे मोठे प्रकल्प या ठिकाणी आले पाहिजेत. बारामतीची सभा देवालाही हेवा वाटावा अशी सभा अजितदादांची आम्ही पाहिली.
Leave a comment