कालपर्यंत बरोबर काम करत असलेले धनंजय मुंडे आता तुम्हाला वाईट वाटू लागले
बीडच्या सभेत माजी आ.अमरसिंह पंडीत स्पष्टच बोलले
बीड । वार्ताहर
टिचभर उंची असलेल्या लेकरांनी अजितदादांबद्दल बोलायचे, त्यांच्यावर टिका करायची हे कालच्या कोल्हापूरच्या सभेत दिसून आले. ज्या लोकांनी कधी भगवानगड पाहिला नाही त्यांना आता भगवानगडाचा कळवळा येतो.कालपर्यंत बरोबर काम करत असलेले धनंजय मुंडे आता तुम्हाला वाईट वाटू लागले हे कुठेतरी थांबले पाहिजे. हे दुर्देवी आहे असे सांगत माजी आ.अमरसिंह पंडीत यांनी आर आर पाटील यांच्या चिरंजीवावर नाव न घेता निशाणा साधला तसेच जितेंद्र आव्हाडांवरही टिका केली.
बीड येथे आज आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तरदायित्व सभेत ते बोलत होते. अमरसिंह पंडीत म्हणाले, शिवछत्रच्या देवघरात पवार कुटूंबियांचे फोटो आहेत. काढता का मग, काढा मग तुमच्यात किती हिमंत आहेत ते बघू.लोक म्हणतात पवार साहेब तुम्ही आमचे विठ्ठल आहेत, ते आम्ही आजही मान्य करतो. मात्र मध्यंतरी माझ्याबद्दल चुकीचे आरोप झाले. साहेब तुम्हीच आमच्यावर असे काही आरोप करत असताल तर ते खुप दुर्देवी वाटते. प्रत्येकवेळी साहेब, अजित दादाचं राज्याच्या राजकारणात गुन्हेगार होवू लागले? हा आमच्या समोर प्रश्न आहे असे सांगत अमरसिंह पंडीत म्हणाले, उद्या कोणत्याही निवडणूका येतील आम्ही शरद पवार साहेबांच्या संस्कारात घडलो आहोत. तुमचे फोटो लावू नका म्हणालात तर आता यापुढे आम्ही तुमचे फोटो लावणार नाही. मी अजित पवारांचा कार्यकर्ता आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. बीड जिल्ह्याच्या दुष्काळाचा लढा देताना माझा नेता शेतकर्यांना कष्टकर्यांना न्याय देईल हा विश्वास मला आहे. दुष्काळ खूप मोठा आहे. आमच्यासमोरचा प्रश्न वेगळा आहे. बीड जिल्हा सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घेणारा जिल्हा आहे. बीटी बियाणाची क्षमता 14 वर्ष आहे. आता ते बियाणे संपले आहे. त्यामुळे या बियाणासंदर्भात विचार करावा अशी मागणी कापूस उत्पादकांतर्फे अमरसिंह पंडीत यांनी व्यक्त केली.
Leave a comment