चौसाळा । वार्ताहर
सार्या जगाची लक्ष असलेली भारताची महत्त्वकांक्षी चांद्र मोहीम तीनचे आज 23 ऑगस्ट बुधवार रोजी रोजी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग झाली ही घटना संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण आहे या क्षणाचा चौसाळा शहरात अनेक ठिकाणी तोफा वाजून एकमेकांना पेढे भरून आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी चौसाळा जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांच्यासह अनेक जणांनी तिरंगा ध्वज लहरावत भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम जय घोष केला.
यावेळी जीवन नाना नाईकवाडे, युवा नेते बाळू नाना नाईकवाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौधरे, बाबासाहेब चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी लक्ष्मण भिलारे, शशिकांत निनाळे, महादेव चौधरे, सतीश हुंबे, नाना तोडकर, सुशील हुंबे, वेताळ, रमेश चौधरे, भिलारे, चौधरे, पिसाळ, गव्हाणे मिस्त्री, पत्रकार पंडित जोगदंड, विकास नाईकवाडे यांच्यासह अनेक नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर डीसीसी बँकेसमोर राष्ट्रप्रेमी नागरिक रमेश जाधव, जहांगीर पठाण सोहेल पठाण यांनीही 11 तोपाची सलामी देऊन चंद्रयान तीन चे यशस्वी लँडिंग चा आनंद उत्सव साजरा केला.
Leave a comment