जयदत्त अण्णा स्पष्टच बोलले म्हणाले खबरदार माझा फोटो वापराल तर

 

बीड | वार्ताहर

 

बीडचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारत भूषण शिरसागर यांचे चिरंजीव तथा नगरसेवक डॉक्टर योगेश क्षीरसागर हे आज त्यांच्या समर्थकांसह मुंबई येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. जयदत्त क्षीरसागर यांनी या प्रवेशाला पाठिंबा दिलेला नाही. असे असतानाही आज डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी प्रवेशा संबंधी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो वापरला आहे मात्र या फोटोवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आक्षेप नोंदवला असून माझा आणि आजच्या प्रवेश सोहळ्याचा काहीही संबंध नाही,माझा फोटो वापरून जनतेची अन कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात आहे,हे तात्काळ थांबवा अस म्हणत सिनीयर क्षीरसागर यांनी पुतण्याला दम दिला आहे.

 

बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातील त्यांचे पुतणे माजी नगरसेवक डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी काका विरोधात बंडखोरी करत अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आज 23 ऑगस्ट रोजी मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे.

 

या प्रवेश सोहळ्यासाठी डॉक्टर क्षीरसागर यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या आहेत तसेच शहरात मोठमोठे होर्डिंग लावले आहेत ज्यावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या फोटोचा देखील वापर करण्यात आला आहे योगेश यांच्या प्रवेश सोहळ्याचा आणि आपला कुठलाही संबंध नसल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे राजकीय स्वार्थासाठी आपण कार्यकर्त्यांना आणि जनतेला विश्वासात न घेता निर्णय घेणार नाही असेही त्यांनी म्हटले होते.

तरीदेखील डॉक्टर योगेश यांनी आपल्या काकाचा फोटो जाहिरातीत आणि बॅनरवर वापरल्याने संतापलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी या बंडखोर पुतण्याला थेट सज्जड दमच भरलाय.

 

एकंदरच काका आणि पुतण्यामधील या शीतयुद्धामध्ये कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक भ्रमित होऊ नयेत म्हणून जगत जयदत्त क्षीरसागर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

काय म्हणाले आहेत जयदत्त क्षीरसागर

 हे त्यांच्याच शब्दात वाचा……… . !

 

आज मुंबई येथे होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही, सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मी कालच जाहीर केली आहे,तरीही माझ्या फोटोचा वापर करून कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण करणाऱ्या चुकीच्या जाहिराती व बातम्यांवर कृपया विश्वास ठेवू नये

-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.