बीड | वार्ताहर

राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना टीसीएस कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे आज होणाऱ्या तीनही सत्रातील परिक्षा नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु होतील. त्याप्रमाणे बदलेल्या वेळेबाबत सर्व परिक्षा केंद्रावर सुचना प्रसारित करण्याची कार्यवाही निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत परिक्षा केंद्राना देण्यात येत आहे. तरी सर्व परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन तसेच टीसीएस कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन तलाठी भरती परीक्षा 2023 समन्वयक आनंद रायते (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

याबाबत आज प्रसिद्धीस दिलेल्या जाहीर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की,तलाठी भरती परीक्षा २०२३ आज दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रावरती नियोजीत करण्यात आली होती. या परिक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी पहिले सत्र ९ ते ११ नियोजीत करणेत आले होते. तथापी टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झालेने सदरचे सत्र वेळेनुसार सुरु करण्यास अडचण निर्माण झाली. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होणेबाबत कळविण्यात आले. टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांनी सर्व देशभरातील परिक्षा संदर्भातील हा तांत्रिक बिघाड झाला असल्याने वरिष्ठ वैज्ञानिक यांच्या स्तरावर याबाबत युध्द पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परिक्षा ११ वाजता सर्व केंद्रवार सुरु करणेबाबत कळविण्यात आले. राज्य समन्वयक यांनी सर्व निवासी उप जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्याना नियोजीत परिक्षा उशीरा सुरु होईल असे कळविण्यात आले. त्याप्रमाणे सर्व परिक्षा केंद्रांवरील परिक्षार्थीना याची सूचना देण्यात आली.

टीसीएस कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करण्यात येवून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर परिक्षा सुरु करणेबाबत सुचना मिळाल्यानंतर सर्व परिक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांना याबाबत सुचित करणेत येवून परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला असून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर ११.०० वाजता परिक्षा सुरु करणेत आली आहे.

राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना टीसीएस कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे आज होणाऱ्या तीनही सत्रातील परिक्षा नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु होतील. त्याप्रमाणे बदलेल्या वेळेबाबत सर्व परिक्षा केंद्रावर सुचना प्रसारित करण्याची कार्यवाही निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत परिक्षा केंद्राना देण्यात येत आहे. तरी सर्व परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच टीसीएस कर्मचारी यांना सहकार्य करावे.

सर्व परिक्षार्थीना नियोजीत दोन तासांचा वेळ परिक्षेसाठी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग परिक्षार्थी यांना आजचे सत्र दोन मध्ये अतिरिक्त देय असणारा वेळ देण्यात येणार आहे. आपणास या निवेदनाद्वारे आज टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांचे कडून तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या दिरंगाई व मनस्तापाबद्दल शासनाच्या वतीने राज्य समन्वयक तलाठी भरती परिक्षा २०२३, यानिवेदनाद्वारे दिलगिरी व्यक्त करीत आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही
तलाठी भरती परीक्षा 2023 समन्वयक आनंद रायते (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.