पाडळशिंगीजवळ एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई

बीड | वार्ताहर

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत थांबलेल्या आयशर टेम्पोचा संशय आल्यानंतर चालकाजवळ जाऊन चौकशी करत असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकाने चक्क पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न करून गुटख्यासह तो टेम्पो पाडळशिंगीच्या दिशेने नेला.  मात्र पोलिसांनी वेळीच टोलनाका परिसरात वाहतूक अडवल्याने हिरापूर जवळ गुटख्यासह टेम्पो ताब्यात घेण्यात आला. 29 जुलै रोजी रात्री 10.45 वाजता ही कारवाई करण्यात आली.31 लाख रुपयांचा गुटखा, टेम्पो, मोबाईल असा 46 लाख 28 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी टेम्पोचालकासह, टेम्पो मालक आणि गुटखा मालक अशा तिघांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा व अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

  पोलिसांच्या माहितीनुसार, टेम्पो चालक सामेनाथ जालिंदर मळेकर (वय 23 रा.मळेकरवाडी ता.पाटोदा), टेम्पो मालक ज्ञानेश्वर भिमराव साळुंके (रा. निगडी पुणे), व गुटखा मालक महारुद्र मुळे (रा. घोडका राजुरी ता.बीड) अशी गुन्हा दाखल झालेले आरोपींची नावे आहेत.

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड पासून जवळच असलेल्या पाली येथील रोहीटे पेटोलपंपाजवळ रस्त्यावर आरोपी सोमनाथ जालिंदर मळेकर हा  टेम्पोमध्ये क्रं. (एमएच.14- जेएल 863)   महाराष्ट्रात विक्री करण्यास प्रतिबंधीत केलेल्या गुटख्यासह मिळून आला. पोलीस कर्मचारी गणेश नवले यांनी त्याला कारवाई करण्यासाठी पोलीस असल्याची ओळख करून दिली, मात्र चालकाने पोलिसांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करताना चक्क स्वतःच्या ताब्यातील टेम्पो पोलीस अंमलदार गणेश नवले यांच्या अंगावर घातला, तसेच पुन्हा दुचाकीवर टेम्पो घालत दुचाकीचे (एमएच.14, एक्यु. 4891) नुकसान केले आणि टेम्पो पळवला. दरम्यान नवले यांनी पळून गेलेल्या टेम्पो बाबत  पाडळशिंगी टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हायवे पोलीस काकडे गडदे आणि परजणे यांनी नाकाबंदी करत टेम्पो पकडला. दरम्यान  टेम्पो व चालकाला बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

याप्रकरणी पोलीस नाईक गणेश नवले यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कलम 307,तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353, तसेच 328, 272, 273, 188, 427, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. गणेश नवले, नामदास, चव्हाण, कानतोडे, थापडे यांनी ही कारवाई केली. 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.