पंकजा मुंडे, विजया रहाटकर राष्ट्रीय सचिव तर विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री

 

 

मुंबई :  भाजपची केंद्रीय पदाधिकाऱ्यांची नवी यादी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील तीघांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री पदी तर पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिव पदी या पुर्विच झालेली  नियुक्ती कायम ठेवण्यात आली असुन नव्या यादीत विजया रहाटकर यांना राष्ट्रिय सचिव करण्यात आले आहे

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या संदर्भातली घोषणा केली. यात काही जुनेच चेहरे आहेत तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही चेहरे बदलण्यात आले आहेत. नवीन यादी नुसार काही नवीन चेहऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कडून राष्ट्रीय स्तरावर देशात ४०० प्लस तर महाराष्ट्रात ४५ प्लस असे मिशन ठेवण्यात आले आहे. यासर्व बाबी लक्षात घेता नवीन पदाधिकाऱ्यांची यादी करण्यात आली आहे.

२ मुस्लीम चेहऱ्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार रमण सिंह, खासदार सरोज पांडे आणि लता उसेंडी, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार वसुंधरा राजे, झारखंडचे रघुवर दास, मध्य प्रदेशचे सौदान सिंह, उत्तर प्रदेशचे खासदार लक्ष्मीकांत बाजपेयी, खासदार रेखा वर्मा आणि विधान परिषद सदस्य सदस्य तारिक मन्सूर, ओडिशाचे बैजयंत पांडा, तेलंगणाचे डीके अरुणा, नागालँडचे एम चौबा एओ आणि केरळचे अब्दुल्ला कुट्टी, प्रोफेसर तारिक मन्सूर, ज्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले होते, ते AMU चे कुलगुरू राहिले आहेत. अब्दुला कुट्टी, तारिक मन्सूर हे २ मुस्लीम चेहरे भाजपाने कार्यकारणीत पुढे आणले आहेत.

जे.पी नड्डा यांच्या टीममधून ‘हे’ चेहरे वगळले

भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीतून दोन नेत्यांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. कर्नाटकातील पराभवामुळे सीटी रवी यांची सरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आसाममधील भाजपा खासदार दिलीप सैकिया यांनाही सरचिटणीस पदावरून दूर केले आहे. यासोबतच हरीश द्विवेदी यांची राष्ट्रीय सचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उपाध्यक्ष दिलीप घोष आणि भारतीबेन श्याल यांचा नव्या कार्यकारणीत समावेश करण्यात आलेला नाही.

महाराष्ट्रातून तीघांना संधी :

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर या तीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विनोद तावडे व पंकजा मुंडे यांचे स्थान तसेच ठेवत त्यांच्यावर पक्षश्रेष्ठीचा विश्वास कायम असल्याचे दाखवून दिले आहे. तर विजया रहाटकर यांना संधी देत त्यांच्यावर सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे असलेली राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांच्याकडे असलेली राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सुद्धा कायम ठेवण्यात आली आहे.

List of BJP

 

बावनकुळे यांनी केले अभिनंदन :

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय पातळीवर नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील नेत्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय स्तरावर पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडे तसेच राष्ट्रीय सचिवपदी पंकजा मुंडे व विजया रहाटकर यांची निवड झाली आहे. याबद्दल या तिघांचे व अन्य पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन!

 

List of BJP

 

18 राष्ट्रीय उपाध्यक्ष :

नव्याटीम मधे 13 जणांची राष्ट्रीय उपाध्यक्ष्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर 8 जणांना राष्ट्रीय सरचिटणीस यासह १३ राष्ट्रीय सचिवांची करण्यात आले आहे यात, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बंदी संजय कुमार आणि राधामोहन अग्रवाल यांना सरचिटणीस करण्यात आले आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.