माजलगावमधून परिवर्तनचा फरार संचालकही गजाआड

बीड । वार्ताहर

परिवर्तन बँकेचा चार वर्षांपासून फरार असलेल्या एका संचालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी माजलगावमधून ताब्यात घेतले. त्यास पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले. तर केज व नेकनूर हद्दीत दरोडा टाकणार्‍या 2 फरार आरोपींना अटक केली. या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पथकातील कर्मचारी राजु पठाण, देविदास जमदाडे, युनूस बागवान, गणेश हांगे यांनी केल्या.
नेकनूर ठाणे हद्दीत वडवाडी येथे दरोड्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी सोन्या उर्फ सोमनाथ सुंदर पवार (30) हा गुन्हा घडल्यापासून पाहिजे आरोपी होता. तो पोलीसांना सतत गुंगारा देत होता. 25 जुलै रोजी तो घोळवे पिंपळगाव येथे आल्याची माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने तेथे जावून त्यास ताब्यात नेकनूर पोलीसांच्या स्वाधीन केले. दरम्यान त्याने केज येथे घरफोडीचे तीन आणि चोरीचा एक गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यायाकडून इतरही मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस येतील असा अंदाज पोलीसांना आहे.

लुटमार प्रकरणातील आरोपीही पकडला

मस्साजोग (ता.केज) शिवारात गतवर्षी 23 मे रोजी महामार्गावर जॅक टाकून वाहनातून खाली उतरलेल्या चालकावर धारदार शस्त्राने हल्ला करत दरोडा टाकणारी टोळी गुन्हे शाखेने उघडकीस आणली होती. यात निष्पन्न झालेला आरोपी दादा चंद्रकांत पवार (रा.रामेश्वरवाडी,ता.केज) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्यास 25 जुलै रोजी नांदूरघाट (ता.केज) येथून पकडण्यात आले.

फरार असलेला परिवर्तनचा संचालक पकडला

गेल्या चार वर्षापासून माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट बँकेचा फरार असलेला संचालक बळीराम भानूदास चव्हाण याला काल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकार्‍यांनी याला माजलगावमध्ये त्याच्या निवासस्थानी पकडले. त्याच्याविरूध्द शिवाजीनगर बीड, पिंपळनेर, आष्टी, पाटोदा, माजलगाव शहर, माजलगाव ग्रामीण अशा सहा पोलिस ठाण्यात गुन्हे आहेत. त्यास पुढील कार्यवाहीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.