महापुरूषांना पुष्पहार घालुन अभिवादन; ग्रामीण भागासह शहरातून निघणार रॅली
बीड /प्रतिनिधी
राष्ट्रवादी-काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आ.संदीप क्षीरसागर पहिल्यांदा बीड मतदारसंघात येणार असून त्यांच्या स्वागताची मोठी तयारी सुरू आहे. शनिवार (दि.22) रोजी ते बीड मतदारसंघात दाखल होणार आहेत.
बीड तालुक्यातील राजुरी (न.) येथे शनिवारी (दि.22) रोजी सकाळी 11 वा. आ.संदीप क्षीरसागर येतील. यानंतर राजुरी नवगन येथे भेटी देऊन ते कार्यकर्त्यां समवेत बीडकडे निघतील. बीडमध्ये दुपारी 12 वा. आगमनानंतर रॅली काढून शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पक्षाचे जिल्हा कार्यालय म्हणजे राष्ट्रवादी भवन येथे थांबतील. दरम्यान आ.क्षीरसागर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मतदारसंघात येणार असल्याने त्यांना भेटण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या प्रमाणावर उत्सूक असल्याचे दिसून येत आहे.
हारे-तुरे स्विकारणार नाही-आ.संदीप क्षीरसागर
दरम्यान कार्यकर्ते, समर्थकांकडून जोरदार स्वागताची तयारी सुरू आहे. परंतु मी कसल्याही प्रकारचे हारे-तुरे स्विकारणार नाही असे आ.क्षीरसागर यांनी सांगितले.
Leave a comment