बीड । वार्ताहर
ग्राहकांना ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवत तब्बल 136 ठेवीदारांची 7 कोेटींहून अधिकची रक्कम परत न करता अपहार केल्याचा आरोप असलेल्या बीड येथील माँसाहेब जिजाऊ पतसंस्थेच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी 11 जुलै रोजी सकाळी बीडमधून अटक केली.
बीड येथील मासाहेब जिजाऊ पतसंस्थेच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकार्यांवर ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 3 जुलै रोजी रात्री शिवाजीनगर ठाण्यात अॅड.संतोष आप्पासाहेब जगताप (रा. चाणक्यपुरी, बीड) यांनी तक्रार नोंदवली आहे.त्यानुसार संस्थेच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बबन शिंदे, मनिष शिंदे, आश्विनी सुनील वांढरे आणि बँकेचे सर्व कार्यकारणी मंडळ यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाचे कलम 406,409 420, 120 ब, सहकलम भारतीय ठेवीदारांच्या वित्त संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे.फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. रक्कम 50 लाखांच्या पुढे असल्याने हा गुन्हा पोलीस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला असून आता ही शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. आर्थिक गुन्हे शखाचे पो.नि.हरिभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी सकाळी बँकेच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे यांना अटक करत न्यायालयात हजर केले.
Leave a comment