कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याही बाबतीत असाच काहीसा प्रकार घडलाय. मंत्री धनंजय मुंडे यांना परळी येथील कार्यालयावर धमकीचा फोन आला असल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीच्या फोननंतर एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारानंतर धमकी देणाऱ्या अज्ञाता विरोधात परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे 50 लाख रुपये द्या नाहीतर जीवे मारेन असे धमाकावणाऱ्याने म्हटल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीकांना कराड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छगन भुजबळ यांच्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनाही सोमवारी रात्री बारा वाजता एका व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. विशेष म्हणजे मला पन्नास लाख रुपये द्या नाहीतर धनंजय मुंडे यांना जीवे मारेन अशी धमकी परळीमधील त्यांच्या निवासस्थानी असलेल्या लँडलाईन फोनवरून त्या व्यक्तीने दिली होती. या फोननंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये परळी पोलीस ठाण्यात वाल्मीक कराड यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
भुजबळांना धमकी देणारा अटकेत
छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याला अटक केली आहे.
Leave a comment