चोरट्यांकडून 12 मोटरसायकल जप्त

माजलगाव प्रतिनिधी
  माजलगाव, गेवराई आणि गंगाखेड येथून या गाड्या चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना शहर पोलिसांनी पकडून त्यांच्या ताब्यातून  पाच लाख रुपये किमतीच्या  एकूण 12 मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

माजलगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी  सचिन रामेश्वर स्वामी (वय 32 वर्ष रा. लऊळ नंबर एक),  व संजय रामेश्वर चाळक (वय 25 वर्षे रा. साईनगर माजलगाव) या सराईत मोटारसायकल चोरट्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून  पाच लाख रुपये किमतीच्या  एकूण 12 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. चोरट्यांनी माजलगाव, गेवराई आणि गंगाखेड येथून  गाड्या चोरी गेल्या होत्या.
    मोटारसायकल चोर हे ज्या मोटरसायकलचे स्विच जूने झाले आहेत, ज्या व्यवस्थित लॉक केल्या नाहीत त्याच गाड्या पाळत ठेऊन चोरटे चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले..  
       सदरील कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-  पवार , सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शन प्रमाणे  पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलिस उपनिरिक्षक गजानन सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे, पोलिस जमादार गणेश तळेकर, पोलिस अमलदर महेश चव्हाण , पोलीस अमलदार साहदू कोकाटे  यांनी केली आहे.

पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की लोकांनी आपले वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावी, शक्यतो समोरच्या व्हीलचे लॉक लावावे. आपल्या वाहनांची काळजी घ्यावी व गाड्या जवळ संशयित व्यक्ती आढळल्यास याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.