मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यभरातील जनतेला चिंतामुक्त करणारा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांना लागू असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती सर्वांसाठी वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे यांनी याची माहिती दिली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत आतापर्यंत जनतेला दीड लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जात होता. त्याची मर्यादा पाच लाखांवर करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दोन कोटी कार्ड वाटली जाणार आहेत, असे शिंदे म्हणाले.
याचबरोबर राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्यात 700 ठिकाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी 210 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यभरात ९ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.
सुधीर मुनगंटीवार बोलताना म्हणाले की, 'आज बैठकीत ४० पेक्षा जास्त निर्णयाला मंजूरी देण्यात आली. निराधार योजनेस मान्यता दिली. श्रावणबाळ योजनेमुळे ४० लाख मुलाना फायदा होईल. या मुलाच्या खात्यात थेट मदत जमा होणार आहे. तर १३५० हॉस्पिटल वाढवण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.
तर या बैठकीमध्ये १० मेडिकल कॉलेजला मान्यता दिली आहे. तर मच्छिमर बांधव जे पाकिस्तान सिमेवर मच्छिमारीसाठी जातात त्यांना अटक होते. अशा मच्छिमारांना सोडवण्याचा व त्याच्या कुटुंबाला ९ हजार महिना देण्याचा निर्णय घेतला सरकारने घेतला आहे.
तर पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एचटीएमएलला अटल बिहारी याचं नाव देण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे वर्सोवा उड्डाण पुलाला सावरकराचं तर एचटीएमएलला अटलजीचं नाव दिलं आहे. तर नावावरून काही वाद नाही. काही शकुणी असे वाद करतात. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे जोडीने काम करतात. ही शोलेची जय विरूची जोडी गब्बर सिंगच्या विरोधात आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.(Latest Marathi News)
तर २५ वर्षात काही बदल करण्यात वेळ लागेल.काही चूक झाली असं म्हणता येणार नाही. उड्डाण पुलाच्या नावावरून आता तेढ नको आहे. जे निर्णय घेण्यात आले आहेत ते लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी १५ आॉगस्टपर्यंत आढावा घेतला जाईल. वर्सोवा उड्डाण पुलाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच नाव दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
- वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
- एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव
- राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, २१० कोटी रुपयांची तरतूद
- भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द, तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित. दोन कोटी कार्ड्स वाटणार पाच लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार
- संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेची रक्कम १००० रूपयांवरून १५०० रुपये
- आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार
- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश (कृषि विभाग)
- मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चाला मान्यता
- पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
- मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भूखंड
- भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
- मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये
- राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र
- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार
- बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
- जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चाला मान्यता
- राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये, ४३६५ कोटी खर्चाला मान्यता
- बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय
- दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार
- दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ
- देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
- चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
- सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
- गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
- ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
- पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार
Leave a comment