बीड । वार्ताहर
राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील 2018-19 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या 76 उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली असुन त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा सन 2018-19 मधील प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने दि.20 जुन 2023 रोजी बीडच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना पत्र पाठवुन कारवाईचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील 2018 मध्ये उत्तीर्ण झालेले 1 तर 2019 मधील 75 उमदवार गैरप्रकार करून शिक्षक पात्र परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे. त्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांविरूध्द शास्ती निश्चित करण्यात येवुन त्यांची संपादणूक रद्द करण्यात आले असुन त्यांचे टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचे आदेश राज्य परिक्षा परिषदेने दिले आहेत.
या 76 उमेदवारांचा समावेश
टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये प्रतिक्षा प्रल्हाद वाघ, रमाबाई बालासाहेब जाधव, कौस्तुभ विजयानंद शिंदे, शिल्पा ज्ञानोबा गिते, उजमा फातेमा रफीक बेग मिर्झा, अर्शद रशिद सय्यद, हुमेरा बानु अजहर हुसेन शेख, हुस्ना यास्मीन शेख हमीद शेख, पुजा भास्कर म्हस्के, संतोष किसन आडे, पुजा धोंडिराम कांबळे, परमेश्वर बाबुराव राठोड, सिमा रंगाराव रूद्रे, अजय शामराव जाधव, फरहा यास्मीन जहीरूद्दीन सय्यद, फौजीया नुरूलहसन लाहोरी, आतीया बेगम शेख मुस्तफा शेख, आस्मा सय्यद मो.सिद्दीक सय्यदा, सोबीया फरहा कादरी सय्यद जहीरूद्दीन कादरी, बीबी हाजेरा शेख साजेद, अस्फीया परवीन मो.अब्दुल बासीत, निशाद अर्जुमंद इजहार मजहरोद्दीन सय्यदा, शमीका बन्सीधर राजवान, मीना भिमराव टिके, उर्मिला अवधुराव वाडे, मुक्ताबाई नरहरी सोगे, प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी, अमोल शिवाजी पाटोळे, द्रोपदी वैजिनाथ सानप, द्रोपदी वैजिनाथ सानप, सविता त्रिंबक घाडगे, सुनिता श्रीराम देवकते, वर्षारानी संभाजी निरडे, मुजाहीद खलील अब्दुल मोमीन, युसूफ शेख युनूस शेख, शाजीया बेगम मो.अब्दुल सत्तार, यास्मीन बेगम सय्यद अब्दुल खादर, उम्मे सायमा वाहजोद्दीन अन्सारी, गणेश जाधव वाकाळे, ज्योती निवृत्तीराव काळे, जीशान हामेद शेख, यास्मीन बेगम जीया अहेमद सिद्दीकी, मोहम्मद खान चाँद खान पठाण, शहेनाज बेगम नजीर शाह, कौसर नवाजखान पठाण, सविता सुंदरराव पवार, प्रणिता प्रकाशराव कुलकर्णी, निलोफर नाजेमोद्दीन काझी, अदनान अहेमद अनीसखान पठाण, फैजानोद्दीन रीजवानोद्दीन शेख, आलिया बेगम शेख सलीम, फौजीया बेगम शरीफखान पठाण, हिना कौसर जमील शेख, शाहीन बेगम बशिरोद्दीन काझी, मुदस्सीर मेहराज शेख, अन्वरी बेगम मुक्तार अहमद सय्यद, शाजीया तसकीम मो.मुनीसोद्दीन सिद्दीकी, सय्यद फरहीन बेगम रहीमोद्दीन, खान कौसर बेगम शकील खान, सलाम मुक्तार अब्दुल, ईरफान जमील दाईनी सय्यद, मोईनोद्दीन चिस्ती सय्यद समीयोद्दीन सय्यद, अजहर अहमद शकील अहमद शेख, मोहम्मद मुजाहेदोद्दीन मो.मोईजोद्दीन सिद्दीकी, जीया अबरार जफर शेख, नुजहत ताहेरा सय्यद जैकी सय्यद, आकेब अली अमानत अली सय्यद, आदील अय्युब सय्यद, शैलेश कलाबा कसबे, कावेरी दिलीप सानप, आयशा तजीन रफीक शेख, घोबाळे सुहासिनी बालाजी, लोंडल विकास अर्जुन, काळे विश्वास बालासाहेब, उज्मा समीतान खीजर अली कादरी, नराळे सुजप्रिया अरूण यांचा समावेश आहे.
Leave a comment