अशोक लोढा, राजेश बंब, उज्वल कोटेचा, ललित अब्बड यांचा आरोप
बीड- प्रतिनिधी
गतवर्षी आम्ही जैन भवनमध्ये सकल समाजाच्या वतीने चातुर्मास घेणार होतो. मात्र तेथील ट्रस्टींनी व त्यांच्या पदाधिकार्यांनी तेथे चातुर्मास घेण्यास विरोध दर्शवला त्यामुळे समाजाच्या हक्काची वास्तू असतांनाही केवळ वाद विवादामुळे इतरत्र पैसे मोजून चातुर्मास घेण्याची वेळ समाजावर आली. आम्हाला विरोध करणारेच आता यंदाचा चातुर्मास त्याच जैन भवनमध्ये घेणार आहेत. मात्र आम्ही त्याला विरोध करून जैन भवनमध्ये चातुर्मास होऊ देणार नाही तसेच इतरत्र चातुर्मास झाल्यास त्यासाठी हवी ती मदतही करू अशी भुमिका सकल जैन समाजाचे अशोक लोढा, राजेश बंब, ललित अब्बड, उज्वल कोटेचा यांनी आज बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. मागील 25 वर्षात जैन दिवाकर शिक्षण संस्थेंतर्गत असलेल्या जैन भवन या वास्तूची आणि संस्थेची कसलीच प्रगती झाली नाही. या ठिकाणी साधु-संतांना त्रास देण्याचे महापाप नितीन कोटेचा व इतरांनी केले.तसेच निधीचा गैरव्यवहार, ठराव न घेता जागा विकणे आणि समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
बीड येथे 21 जून रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक लोढा, राजेश बंब, ललित अब्बड, उज्वल कोटेचा यांनी जैन दिवाकर शिक्षण संस्थेचा आणि नितीन कोटेचा व इतरांच्या कारभारावर टिका केली. नितीन कोटेचा व इतरांनी 25 वर्षात संस्थेची काहीच प्रगती केली नाही. शहरात जैन समाज मोठ्या प्रमाणावर असतांना जैन भवनमध्ये केवळ 120 जणांना सदस्य केले. त्यातही जवळच्या लोकांची नावे लावली. साधु-संतांना विरोध करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चातुर्मास किंवा इतर धार्मिक कार्यात साधु संतांना त्रास देण्याचे काम केले. निधीचा गैरव्यवहार, ठराव न घेता जागा विकणे असे विविध प्रकार झाले आहेत. या संस्थेवरून वाद-विवाद निर्माण होवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आल्याचे लोढा यांनी सांगितले. ज्या संस्थेत नितीन कोटेचा असतात तिथे वाद-विवाद होतातच असे सांगून लोढा यांनी अनेक उदाहरणे दिली. त्यामुळे त्यांना प्रत्येक संस्थेतून बाजूला सारण्याचे काम झाल्याचे लोढा यांनी सांगितले.
गतवर्षी बीडमध्ये जैन भवन मध्ये समाज बांधवांची इच्छा होती शिवाय बीडच्याच कन्या साध्वीजी प्रथम बीडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी ट्रस्टींनी जैन भवनमध्ये चातुर्मास करण्यास विरोध केला होता.त्यामुळे सकल जैन समाज बांधवांना हा चातुर्मास शहरातील इतर जागेत किराया देऊन करावा लागला. आता हेच लोक यंदाचा चातुर्मास जैन भवन या वादविवाद सुरू असलेल्या संस्थेच्या जागेत घेत आहेत मात्र आम्ही जैन भवनमध्ये चातुर्मास घेण्यास विरोध दर्शनावर आहोत. जैन भवन समोर 23 जून रोजी लोकशाही मार्गाने निदर्शने करू असा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेला महेंद्र दुग्गड, ऋषभ बाफना, किशोर नहार, आशिष संचेती, पारस संचेती आदि उपस्थित होते.
Leave a comment