बीड । वार्ताहर
बीड येथील प्रगती विद्यालयाची विदयार्थिनी कु. हर्षा दिलीप सानप हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी परीक्षेत 300 पैकी 242 गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले असून शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे.
तिच्या या यशाबद्दल प्रगती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण बांगर , सचिव सौ. सत्यभामाताई बांगर, शाळेचे मुख्याधापक गोपालघरे यांच्यासह सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. कु. हर्षा ही बीड तालुक्यातील आदर्श शिक्षक दिलीप सानप आणि सौ. मीना विघ्ने सानप यांची कन्या तर बीड येथील प्रसिद्ध दातांचे डॉक्टर अशोक सानप यांची पुतणी आहे. या परीक्षेसाठी तिला आजोबा श्री. दिनकरराव सानप गुरुजी तसेच प्रवीण सानप सर या गुरुजनांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल तिचे डॉ. महारुद्र राख, महेश भट, संजय वाघुले, सोमीनाथ दौंड, महेश आघाव आदींनी अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave a comment