होके,जगताप,आडसकर, नाईकनवरे वर घणाघाती प्रतिहल्ला

 
माजलगाव: उमेश जेथलिया
 
वडवणीचा गुलाल आणखी डोक्यावरून पुसला नाही उद्या माजलगावला ही गुलाल आमचाच असे सांगत माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागावर विजय मिळणार असल्याचे सांगत माजी राज्यमंत्री आ प्रकाश सोळंके यांनी माजी आ राधाकृष्ण होके पाटील,रमेश आडसकर ,मोहन जगताप व नितीन नाईकनवरे,अप्पा साहेब जाधव यांच्यावर घणाघाती हल्ला करत सर्व विरोधकांचा आज दुपारी 4 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत कडक शब्दात समाचार घेतला.
       माझा मुलगा उच्चशिक्षित असून चांगला शेतकरी आहे तो केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक होणार आहे कुठला ही पदाधिकारी होणार नाही हे स्पष्ट करत  मी आमदार असताना आडसकर व जगताप हे उठसुठ कोणत्याही कामाचे श्रेय घेत आहेत त्यांना त्या खात्याचे मंत्री कोण आहे हे माहीत नाही तरी ते म्हणतात मीच काम आणले अस बोलत आ प्रकाश सोळंके यांनी विरोधकांना चारी मुंड्या चित केले.यावेळी अशोक डक,संभाजी शेजुळ,अचय्युत लाटे,जयदत्त नरवडे,व्यापारी उमेदवार बंडू इके,बळीराम कदम उपस्थित होते.
 
 

घरातले 5 संचालक घेणाऱ्या आमदारपुत्र जगतापानी आमच्या पुत्रप्रेमावर बोलू नये

 
 सावरगाव च्या छत्रपती कारखान्यात 5 संचालक घरचे असणारानी आमच्या पुत्र प्रेमावर बोलु नये असे म्हणत आ सोळंके यांनी आज मोहन जगताप यांच्या वरील आरोपांचा पाढाच आज वाचण्यास सुरुवात केली.छत्रपती कारखान्यावर मोहन जगताप यांच्या भावकितील पाच संचालक असताना कार्यकर्त्यांच्या मुंडीवर पाय दिल्याचे सांगितले तर दुसरा आरोप करताना छत्रपती साखर कारखान्याचा साखर उतारा चोरून प्रतिटन शेतकऱ्यांचे 381 रु मोहन जगताप यांनी चोरल्याचे सांगितले तिसरा आरोप करताना छत्रपती साखर कारखान्या वरील कामगारांचे शोषण जगताप हे करत असून 10 वर्ष होऊन ही कामगारांना वेतन आयोग लागू न केल्याचा आरोप केला.चौथा आरोप मोहन जगताप हे सभासद शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जात नाही असा केला.तर 5 वा आरोप अतिशय भयानक असून छत्रपती कारखान्यावर उसाने शेतकऱ्याला मारण्याचे प्रकार घडले असल्याचे आ प्रकाश सोळंके यांनी सांगितले  तर स्वतःच पोस्टर लावून त्यावर भावी आमदार लिहून कोणी भावी आमदार होत नसतो त्यासाठी पहाटे 6 ला उठून 11 वाजेपर्यंत 300 माणसांची भेट घ्यावी लागते अस सांगत रात्रीचे जागरण व सेवन बंद करा असा अनमोल सल्ला जगताप यांना आ प्रकाश सोळंके यांनी दिला.
 
 

पोरामुळे माझ्यात व किसनराव मध्ये वितुष्ट आले

 

आम्ही खानदानी श्रीमंत लोक आहोत  माझ्यावर आरोप करण्यापूर्वी आमच्या माजी सभापतींनी वडिलांचा सल्ला घ्यावा बहिणीच्या लग्नाला मी काय मदत केली,हार्टच्या ऑपरेशन ला काय मदत केली ते वडिलांना विचारावे नंतर बोलावे
नितीन नाईकनवरे मुळे किसनराव व आमच्यात वितुष्ट आलं आमची 37 वर्षाची मैत्री तुटली असाही खळबळजनक दावा आ प्रकाश सोळंके यांनी केला.
 
 

मी तोंड उघडले तर होकेच्या संपूर्ण कुटुंबावर फौजदारी 

 
 मी राधाकृष्ण होके यांच्या विषयी एकेरी उल्लेख केला नसून गडी ऐनवेळी कच खातो ही ग्रामीण म्हण मी बोललो मात्र त्याचा गैरअर्थ काढला गेला. माझ्याकडे त्यांचे अनेक प्रकरण आहेत मी तोंड उघडले तर फौजदारी गुन्हे दाखल होतील एक न अनेक प्रकरण माझ्याकडे आहेत पण योग्य वेळ आली तर आपण तोंड उघडू.शरद पवार घरी आले म्हणून की आणखी "कोणी" घरी आले म्हणून 2009 मध्ये तुम्ही आमचा प्रचार केला ते आम्हाला सांगण्यास भाग पाडू नका चार लोक साक्षीदार आहेत त्या घटनेचे असेही आ सोळंके यावेळी म्हणाले.
 
 
आप्पासाहेब जाधव आर्थिक तडजोडी करतो,वडवणी नगरपंचायतला मुंडेंच्या दावणीला पॅनल बांधल्याचा आरोप आ प्रकाश सोळंके यांनी केला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.