माजलगाव, प्रतिनिधी
बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी असुन खरेदी - विक्री संघाच्या निवडणुक निकालानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांचेवर खालच्या पातळीवर एकेरी उल्लेख करत टिका केली. होके पाटलांची आमदार सोळंके यांनी माफी मागावी तसेच बाजार समितीच्या विकास कामाबद्दल बोलावे असे बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले. बाजार समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असुन ही निवडणुक प्रतिष्ठेची व अटी तटीची होत आहे.
बाजार समिती राष्ट्वादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यातुन हिसकावुन घेत या बाजार समितीवर भाजपाचा झेंडा निश्चितच फडकावला जाईल. मतदारांना पर्याय दिला असुन माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे नेते मोहन जगताप यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन शेतकरी विकास पॅनल हा सक्षम पॅनल असुन सर्वसामान्य व लोकप्रिय उमेदवार दिले आहेत. बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बाजार समितीच्या विकास कामांबद्दल बोलण्याएैवजी आमदार प्रकाश सोळंके यांनी माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांचा एकेरी उल्लेख करत खालच्या पातळीवर टिका केली असुन आमदार सोळंके यांनी होके पाटलांची माफी मागावी असे सांगत बाजार समितीच्या सभापती पदी असतांना शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या हिताचे निर्णय घेत शेतक-यांचा विकास हाच केंद्रबिंदु डोळ्यासमोर ठेवला होता. फुलेपिंपळगाव येथील शिवारात तरूण उद्योजकांना व्यवसायाला संधी मिळावी याकरीता आडत दुकानांचे स्थलांतर केले. एक रूपयांमध्ये जेवण, कृषीरथ तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. बाजार समितीच्या सर्वांगीण विकासाकरीता परिवर्तन शेतकरी विकास पॅनल ताकदीने निवडणुकीमध्ये उभा असुन मतदारांची साथ आणि समर्थन भक्कमपणे मोहन जगताप यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलला असल्याचेही माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी सांगीतले.
Leave a comment