एसपी नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस सेलची भरीव कामगिरी

 

 

बीड । वार्ताहर

 

 

केंद्र शासनाच्या अत्यंत ई गव्हर्नन्स प्रकल्पाअंतर्गत एनसीआरबी अर्थात ‘नेशन क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ नवी दिल्ली यांच्याकडून  सीसीटीएनएस (क्राईम अ‍ॅन्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क अ‍ॅन्ड सिस्टिम) ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत पोलीस ठाण्याचे सर्व कामकाज संगणकीकृत व ऑनलाईन पध्दतीने चालते. विविध कामगिरीचे मुल्यांकन करून प्रत्येक महिन्यास राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जिल्हयाची क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यासंबंधाने राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे व्दारे केलेल्या फेब्रुवारी 2023 च्या मुल्यांकनात बीड जिल्ह्याचा 342 पैकी 335 गुण प्राप्त करून राज्यातून प्रथम क्रमांक आला आहे. या बाबतचे अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे याचे पत्रक प्राप्त झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस सेल बीडचे सर्व नोडल अंमलदारांच्या अथक परिश्रमाचे हे फळ असल्याचे सांगण्यात आले.

 

 

सीसीटीएनएस अंतर्गत सिटीझन पोर्टलव्दारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन तक्रारी व अर्जाचा निपटारा मुदतित होते किंवा कसे? आयटीएसएसओ (इनव्हिस्टिगेशन ट्रेकिंग सिस्टिम फॉर सेक्सुयल ऑफेन्स) पोर्टलव्दारे जिल्हयात महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार संबंधाने दाखल गुन्हयाची निर्गती मुदतीत होते किंवा कसे ? या बाबतचा आढावा सीसीटीएनएस प्रणालीव्दारे ऑनलाईन घेऊन प्रलंबित कामकाजाबाबत संबंधित पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात येतात. अपर पोलीस महासंचालक,गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाकडून सीसीटीएनएस प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या राज्यातील एकुण 53 घटकांच्या मासिक कामगिरीचे मुल्यांकन करून उत्कृष्ठ कामगिरी करणाच्या घटकांची क्रमवारी जाहीर करण्यात येते.

 

 

या कामगिरीची पडताळणी करताना सीसीटीएनएस प्रणालीमध्ये अद्ययावत केल्या जाणार्‍या 18 फॉर्म ( नोंदणी फॉर्म,तपास व अभियोग फॉर्म),महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार संबंधाने दाखल गुन्हयांची मुदतीत निर्गती करून अभिलेख सीसीटीएनएस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे प्रमाण, सिटीझन पोर्टलवर नागरिकांकडून ऑनलाईन प्राप्त अर्ज तक्रारीची मुदतित निर्गती, दैनंदिन दाखल गुन्हयांचे एफआयआर सिटीझन पोर्टलवर प्रकाशित करणे , सीसीटीएनएस प्रणाली मधील उपलब्ध अभिलेखाचा वापर करून गुन्हे उघडकीस आणणे, याबरोबरच आरोपी व संशयितावर दाखल पूर्व गुन्हयांचे अभिलेख पडताळणी करुनः गुन्हयांच्या स्वरूपानुसार त्यावर प्रतिबंधक कारवाई करणे अशा विविध कामगिरीचे मुल्यांकन करून प्रत्येक महिन्यास राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जिल्हयाची क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यासंबंधाने राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे व्दारे केलेल्या फेब्रुवारी 2023 च्या मुल्यांकनात बीड जिल्ह्याचा 342 पैकी 335 गुण प्राप्त करून राज्यातून प्रथम क्रमांक आला आहे.

 

एसपी नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस सेलची भरीव कामगिरी

 

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थागुशा पो.नि. सतीश वाघ, सीसीटीएनएस सेल बीडचे अधिकारी सहाय्यक निरीक्षक शामकुमार डोंगरे, अंमलदार पोना निलेश ठाकुर, मच्छिद्र बीडकर, चंद्रसेन राऊत यांनी विशेष परिश्रम घेऊन केली. सीसीटीएनएस सेलच्या कर्मचार्‍यांनी वेळोवेळी कामकाज अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. वेळोवेळी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला पोलीस ठाण्याचे सीसीटीएनएस नोडल अंमलदार यांनी उत्तम प्रतिसाद देत अथक परिश्रम करून हे यश मिळवून बीड पोलीस दलाच्या यशात नवीन उच्चांक स्थापन केला आहे. ही कामगिरी सीसीटीएनएस नोडल अंमलदार यांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे.

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.