रब्बी हंगामातील पिकांची झाली राखरांगोळी
आष्टी । रघुनाथ कर्डीले
आष्टी तालुक्यातील कडा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आज शनिवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांना झोडपून काढले. यामुळे शेतकर्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे.
आष्टी तालुक्यातील कडा,शेरी,देवीनिमगाव,टाकळी, डोंगरगण,दादेगाव सह अनेक गावांत शनीवारी दुपारच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह वादळी वार्याने पावसाला सुरुवात झाली या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका गहू ,कांदा ,हरभरा या पिकांचे नुकसान झाले असून आंब्याला लागलेल्या कैर्या वादळी वारा व पावसाने गळून पडल्या आहेत. एकीकडे खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला होता मात्र त्यानंतर रब्बी हंगामात तरी दोन पैसे हाती येतील अशी अपेक्षा होती. सध्या गहू ,हरभरा,कांदे ,मका ही काढणीला आलेले पिके या पावसामुळे नुकसान झाले असल्याने शेतकरी वर्ग पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
शनिवारी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे शेतकर्यांच्या तोंडचा घास गेल्याने शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
वादळी वार्याने डोईठाण जि.प.शाळेचे पत्रे उडाले
तालुक्यातील जि.प.प्रा. शा.लमाणतांडा, केंद्र डोईठाण येथील शाळेवरील पत्रे 3.30 वाजता अचानक आलेला पाऊस व वादळ यामूळे उडून गेले. नशीब बलवत्तर होते म्हणून कोणालाही इजा झाली नाही. कागदपत्राची मात्र खूप वाताहात झाली. काही कागदपत्र उडून गेले तर काही पावसाने भिजून चिंब झाली आहेत.
ग्रामस्थांच्या मदतीने त्या खोलीतील साहित्य दुस-या खोलीत हलवले आहे. पडत्या पावसात ग्रामस्थांनी केलेले सहकार्य केले. पत्रे छतापासून 200 ते 250 फुट मानवी वसाहतीत पडले. एक महीला सुदैवाने वाचली.
Leave a comment