गहू, ज्वारी,आंब्यासह फळबागांचे मोठे नुकसान   

  



नेकनूर । वार्ताहर



केज तालुक्यातील बोरगाव बु. येथे तासभर वार्‍यासह जोरदार पाऊस पडला. मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतातील गहू ,ज्वारी सह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणात झाडे पडली .या पावसामुळे ओढे वाहु लागले.बोरगावच्या शिवारात शनिवारी दुपारी अडीचते साडेतीन वाजता जोरदार वार्‍यासह आलेल्या गारांच्या पावसाने हाहाकार उडवला  अनेकांचे काढणीला आलेले गहू,ज्वारी  या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी मळण्यासाठी शेतात गोळा केलेले  कणसं पाण्यात बुडाली.फळबाग, चिकू, आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जोरदार वार्‍याने झाडे उन्मळून पडली आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अवकाळीचा मार शेतकर्‍यांचे मोठे नुकसान करणारा ठरला आहे.

 



हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज आज शनिवारी खरा ठरला. केज तालुक्यातील देवगाव परिसरात 8 एप्रिल रोजी सकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या दरम्यान वादळी बार्‍यासोबत वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. देवगाव येथे शेतात एका बैलाच्या अंगावर वीज कोसळली. यात त्या बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे शेतकरी नारायण मोहन मुंडे यांचे मोठे नुकसान झाले अहे.जिल्ह्यात बीड शहर व परिसरातही

आज सकाळी ढगांच्या गडगडाटासह काही वेळ हलका पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. केज, अंबाजोगाई तालुक्यातही या पावसाने हजेरी लावली. केज तालुक्यातील देवगांव शिवारात असलेल्या घोलातील शेतात बैलावर वीज कोसळली. यात शेतकरी नारायण मुंडे यांच्या मालकीचा बैल जागीच ठार झाला. दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतात उभ्या गहू, बाजरीसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

 



मार्चमध्ये 3802 हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान



यापूर्वी जिल्ह्यात गत मार्च महिन्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. यात  जिल्ह्यात 8 तालुक्यात 7 हजार 850 शेतकर्‍यांचे 3 हजार 802 हेक्टर क्षेत्रावरील जिरायत, बागायत व फळबागांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून प्रशासनाकडून शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.यासाठी 6 कोटींच्या मदतनिधीची मागणी करण्यात आलेली आहे. असे असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा एकदा बळीराजा अडचणीत सापडला आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.