जाणून घ्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या आहेत?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅन कार्डशी आधारकार्ड लिंक करण्यात होत असलेल्या विलंबाबत करण्यात आलेल्या दंडाच्या तरतूदीच समर्थन केले आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत आधारशी पॅन लिंकिंग मोफत होते, त्यानंतर १ एप्रिल २०२२ पासून त्यावर ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती. जे आता जुलै महिन्यात १००० रुपये करण्यात आले. सध्या परिस्थिती अशी आहे की ३० जून २०२३ पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर ते निष्क्रिय होईल. If PAN card is not linked with Aadhaar card by 30th June your PAN card will be deactivated
आज एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, ‘’यापूर्वी पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी खूप वेळ दिला जात होता. पॅनला आत्तापर्यंत आधारशी लिंक करायला हवे होते. ज्यांनी आजपर्यंत तसे केले नाही त्यांनी त्वरित करावे. सध्या निश्चित केलेली मुदत संपल्यास दंडाची रक्कम आणखी वाढवली जाईल.’’
TDS आणि TCS संबंधित समस्या टाळण्यासाठी अर्थ मंत्रालयाने २८ मार्च रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत त्याचे आधार पॅन कार्डशी लिंक केले पाहिजे. जर लोकांनी असे केले नाही तर त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि त्यांना TDS आणि TCS दावे मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
निवेदनानुसार, प्राप्तिकर कायदा, 1961 अंतर्गत, ज्या लोकांच्या नावे १ जुलै २०१७ पर्यंत पॅन कार्ड जारी करण्यात आले आहे आणि ते आधार कार्डसाठी पात्र आहेत, त्यांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत आधार आणि पॅन लिंक करावे. सध्या पॅनला आधारशी लिंक करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेले नाही, त्यांचे पॅनकार्ड १ जुलै २०२३ पासून निष्क्रिय होईल.
Leave a comment