आष्टी । वार्ताहर
सन 2022-23 यावर्षी फेब्रुवारी 23 मध्ये सुरुवातीला कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचे होणारे नुकसान कमी व्हावे यासाठी शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांना प्रति क्विंटल 350/- रुपये अनुदान..200 क्विंटल मर्यादेत.. देण्याचा निर्णय जाहीर केला आहे दिनांक 1फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये.. संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट अनुज्ञप्ती धारक, अथवा नाफेड कडून उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये, विक्री केलेल्या शेतकर्यांना अनुदान देण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे. मात्र पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांनी 29/03/2023 रोजीच्या पत्राद्वारे.. शेतकर्यांच्या सातबारावर कांदा पीक नोंदणी आवश्यक आहे... अशी अट घालण्यात आल्याचे समजते..परंतु बहुतांशी शेतकर्यांनी सातबारावर कांदा पिकाची नोंद केली नसल्याचे निदर्शनास आलेले असून अशा प्रकारच्या नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत अल्प असून सदरील नोंदणीसाठी कालावधी वाढवून देण्यात यावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांचे कडे केली आहे.
आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कांदा उत्पादक शेतकर्यांनी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये.. कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार, थेट अनुज्ञप्ती धारक, अथवा नाफेड कडून कांदा खरेदी करण्याकरता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकर्यांना अनुदान देण्यात येणार आहे. तथापि,29 मार्च 2023 रोजी पणन संचालक,महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संबंधित शेतकर्याच्या सातबारा वर कांदा पिकाची नोंदणी करणे आवश्यक आहे अशी अट घालण्यात आलेली आहे.. त्यासाठी बहुतांशी शेतकर्यांनी अशा प्रकारचे नोंद केली नसल्याने आणि संबंधित नोंद करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेसाठीच्या वेबसाईटचे सर्वर डाऊन असल्यामुळे...नोंदणी होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.तलाठ्यांकडे नोंदणी करण्यास गेलेल्या शेतकर्यांचे काही ठिकाणी 50 टक्के तर काही ठिकाणी 15 टक्के नोंदणी झाली असून 100ड्ढ कुठेही झालेली नाही त्यामुळे शेतकर्यांसमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे पीक कांदा ई नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेली 20 /04/2023 ही मुदत वाढवणे आवश्यक असल्याने. याबाबत एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, म उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पीक नोंदणी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
---------
Leave a comment