आष्टी - प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री साईनाथ विज सेवकांच्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल विश्वनाथ शेंबडे, उपाध्यक्षपदी रमेश गोविंद बनसुडे तर मानद सचिवपदी शेख शाकीर इब्राहिम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आष्टी तालुक्यातील वीज कर्मचाऱ्यांची पतसंस्था कडा येथे असून स्वतःची इमारत असणारी भव्यदिव्य अशी पतसंस्था आहे. तसेच या पतसंस्थेत अनेक दिवसापासून पारदर्शी कारभार सुरू असल्याने पतसंस्थेचा नावलौकिक आहे . मागील पंधरा दिवसांपूर्वी आ.सुरेश धस,ज्येष्ठ नेते देविदास आबा धस यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक अविरोध करण्यात आली होती त्यामध्ये संचालक म्हणून विठ्ठल शेंबडे ,रमेश बनसुडे , शेख शाकिर अमोल कर्डिले ,अशोक काकडे,अमृत आजबे, महेश घोडके,उषा जगदाळे, निर्मला गळगटे,नवनाथ कर्हे, अश्विन मंडाळे यांची बिनविरोध निवड झाली होती. आज दिनांक एक एप्रिल रोजी संस्थेच्या कार्यालयामध्ये पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये चेअरमन पदासाठी विठ्ठल शेंबडे, व्हॉइस चेअरमन साठी बनसुडे, तर मानद सचिवपदी शेख शाकिर यांचे एक-एकच अर्ज आल्याने वरील निवडी बिनविरोध करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शांतीलाल भोसले यांनी काम पाहिले तर त्यांना राऊत बी.एम. व मारुती कर्डिले यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार सुरेश धस, जेष्ठ नेते देविदास आबा धस सरपंच युवराज पाटील ,उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, अनिल तात्या ढोबळे,माजी चेअरमन अनिल वांढरे ,प्रशांत पोकळे भाऊसाहेब निंबाळकर ,नितीन खिळे ,माजी उपाध्यक्ष भालचंद्र जगताप,यांच्या सह वीज कर्मचारी पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी अभिनंदन करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave a comment