भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या मुहूर्तावर आयोजन
संत-महंतांसह, जिल्हाधिकारी, सीएस, डीएचओ यांची राहणार उपस्थिती
4 ते 6 एप्रिल दरम्यान अहिंसा रॅली, हास्य कवी संमेलन, भक्तीसंध्या, प्रबोधनात्मक मार्गदर्शन
बीड - प्रतिनिधी
संपूर्ण विश्वाला अहिंसाचा संदेश देणारे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती व सकल जैन समाज परिवाराच्यावतीने बीड शहरात दि. 4 एप्रिल ते 13 एप्रिल 2023 पर्यंत धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पावन मुहूर्तावरच बीड शहरातील जालना रोडवर आनंदऋषी डायग्नोस्टीक सेंटरचा भव्य शुभारंभ श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र चाकरवाडीचे मठाधिपती महादेव महाराज, श्रीक्षेत्र बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, जि.प.चे सीईओ अजित पवार, सीएस डॉ.सुरेश साबळे, डीएचओ डॉ.अमोल गिते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बरोबरच संतोष बोथरा, सतीश लोढा, निखिलेंद्र लोढा, महेंद्र कांकरिया, सचिन भंडारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव समिती बीड व समस्त सकल जैन समाज परिवार बीडच्यावतीने करण्यात आले आहे.
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त त्रिदिवसीय कार्यक्रम बीड शहरातील बंब नगरी, संत सावता माळी चौक, कृष्ण मंदिर रोड बीड येथे संपन्न होणार आहेत. या निमित्त 4 एप्रिल रोजी शहरातून अहिंसा रॅली काढण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी 10.30 वा. आनंदऋषीजी डायग्नोस्टीक सेंटरचा भव्य शुभारंभ संत-महंतांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. याच दिवशी डॉ.धनराज वाघमारे यांचे मोफत दंत रोग तपासणी शिबीर एकदंत डेंटल क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आले.
त्यानंतर सायं.6.30 वाजता हास्य कवि संमेलन होईल. प्रसिध्द कवि अरुण जेमिनी (हरियाणा), लाफ्टर ब्लास्टर चिराग जैन (दिल्ली) आणि डॉ.भुवन मोहिनी (इंदोर) हे आपल्या विनोद निर्मितीतून उपस्थितांच्या चेहर्यावर हास्य फुलवतील. 5 एप्रिल रोजी सायं. 6.30 वा. युवा संगीतरत्न तथा प्रसिध्द गायक विकी पारेख यांचा ‘एक शाम महावीर के नाम’ हा भक्तीसंध्येचा कार्यक्रम संपन्न होईल. तर 6 एप्रिल रोजी सायं. 6.30 वा. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त प्रसिध्द व्याख्याता राहुल कपुर जैन यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न होईल. हे सर्व कार्यक्रम शहरातील संत सावता माळी चौक, कृष्ण मंदिर रोड, बंब नगरी येथे संपन्न होणार आहेत. या बरोबरच तीन दिवसात दुपारी 1 ते 5 या वेळेत शुभाष रोडवरील जैन भवन येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणार्यांनी सी.ए.आदेश नहार, ऋचिता पोरवाल, प्रिया बंब, सविता मरलेचा, नम्रता बोरा, तेजस्वी पडधरिया यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान या विविध स्पर्धेत सहभागी होणार्या विजेत्यांना 6 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात आकर्षक पारितोषिक देवून गौरविले जाईल.
Leave a comment