बीीड । वार्ताहर
अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणार्या गोळ्या सीलबंद पाकीटमध्ये सोबत घेऊन फिरणार्या एका तरुणास पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याकडून एकूण 1120 गोळ्या जप्त करण्यात आल्या. 29 मार्च रोजी पावणे अकराच्या सुमारास बीड बसस्थानकाच्या बाजूला, सिंमेट रोडवर महिंद्रा शोरूमच्या पाठीमागे, पत्र्याच्या शेडच्या बाजूला बाभळीच्या झाडाखाली पोलीस अधीक्षकांच्या विशेेष पथकाने ही कारवाई केली. आरोपीसह त्याला या गोळ्या पुरवणार्या अन्य एकाविरुध्दही शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलीसांच्या माहितीनुसार, मोहनसिंग हिरासिंग टाक (वय 20) असे आरोपीचे नाव आहे.हा अवैध विनपरवाना नशा करण्यासाठीं वापरण्यात येणार्या गोळ्या सीलबंद पाकीटमध्ये सोबत घेऊन त्याची विक्री नशा करण्यासाठी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तेथे जाऊन छापा मारला असता सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 112 गोळ्यांचे पाकीटे आढळून आले. ते जप्त करण्यात आले. औषध प्रशासनाचे औषध अधिकारी दुसाने यांच्या साह्याने सदर कारवाईमध्ये नमूद गोळ्या बाबतचा सविस्तर जप्ती पंचनामा केला. तसेच सदर आरोपीस माल पुरविणारा विशाल थोरात (रा.रिपोर्टर भवनच्या बाजूला, बीड) अशा दोघांविरुध्द शिवाजीनगर गुन्हा नोंद करण्यात आला.
------------
Leave a comment