आज नारळी सप्ताहाची स्वामी योगीराज
महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता
बीड : श्री क्षेत्र रामगड येथे श्रीराम नवमीनिमित्त यात्रोत्सव आहे. तसेच गडावर सुरु असलेल्या नारळी सप्ताहाची आज गुरुवार, 30 मार्च रोजी मठाधिपती हभप स्वामी योगीराज महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशितील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र रामगड संस्थानचे मठाधिपती स्वामी योगीराज महाराज यांनी केले आहे.
प्रभुश्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून श्री क्षेत्र रामगडाची ओळख आहे. या थोरल्या गडावर दरवर्षी श्रीराम नवमीनिमित्त मोठी यात्रा भरते. तसेच यावर्षी गडाचा 44 वा नारळी सप्ताह उत्साही वातारणात गडावरच संपन्न होत आहे. सप्ताहात रामकथेसह कीर्तनाला रामभक्तांची मोठी मांदीयाळी असायची. आज या सप्ताहाची स्वामी योगीराज महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. व त्यानंतर कुटे ग्रुपच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशितील भाविकांनी काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र रामगड संस्थानचे मठाधिपती स्वामी योगीराज महाराज यांनी केले आहे.
Leave a comment