शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

पुन्हा एकदा ' आला रे आला वाघ आला'

 
माजलगाव
 
तालुक्यातील गेवराई सीमेवर असलेल्या इरला मजरा शिवारात अशोक काठवडे हे शेतात  बाजरीला पाणी देत असताना अचानक समोर मंगळवारी दुपरी 5 वाजण्याच्या दरम्यान वाघ दिसल्याने एकाच खळबळ उडाली आहे. या परिसरात शेतकरी वर्गात भितीचे वातावरण असून  वनाधिकारी व तहसिल चे अधिकारी या गावात पोहचले आहेत दोन वर्षांपूर्वी अशीच  8 ते 10 गावात भीतीचे वातावरण होते.आजही तो वाघ आहे की तरस हे लवकरच स्पष्ट होईल.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील इरला मजरा हे गाव गेवराई व माजलगाव च्या सीमेवर आहे या भागात माजलगाव धरणाच्या बॅक वॉटर चे पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. इरला मजरा येथील शेतकरी अशोकराव काठवडे हे शेतात काल मंगळवार दि.२८ रोजी दुपारी 5 वाजण्याच्या दरम्यान बाजरीला पाणी देत होते. तर त्यांना अचानक पाच सहा फुटांवर वाघ दिसला. वाघाची व त्याची नजरा नजर झाली, मात्र सुदैवाने त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आणि त्यांच्यावर वाघाच्या तावडीतून आपण सुटल्याचे त्यांनी धावत पळत गावात येऊन गावकऱ्यांना सागितले. यावर गावातील 10 ते 15 लोक  काठ्या  घेऊन पुन्हा कुठे वाघ दिसला हे पाहण्यासाठी गेले असता वाघाच्या पावलाचा मागोवा घेत घेत काही अंतरावर गेले. तर समोर पुन्हा वाघ दिसला, लोकांनी आरडा ओरड केल्याने त्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकत, शेजारील असणाऱ्या गेवराई तालुक्यातील चिंचोली शिवारात पळून गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
तहसिल प्रशासनास माहिती ग्रामस्थांनी दिली असता रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान नायब तहसीलदार यांनी भेट दिली होती वनविभाचे व तहसिल चेअधिकारी सद्या ठाण मांडून आहेत
 
 

वनविभागाचे अधिकारी दाखल

वन विभागाचे अधिकारी दाखल झाले असून पावलांच्या ठस्यावरून तरस असल्याचा अंदाज वनाधिकारी व्यक्त करत आहेत अशी प्रतिक्रिया दै लोकप्रश्न ला तहसीलदार वर्षा मनाळे यांनी दिली.
 
 
 
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.