सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई
गुटखा आणि टेम्पो सह 51 लाखांचा मुद्देमाल जप्त आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड | वार्ताहर
जिल्ह्यात गुटख्याचा खुलेआम काळाबाजार सुरू असल्याचे पोलिसांकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या कारवायातून स्पष्ट होत आहे. मध्यप्रदेशातील इंदोर येथून परळीतील एका व्यापाऱ्यासाठी आलेला तब्बल टेम्पोभर गुटखा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने कारवाई करत जप्त केला. आज 15 मार्च रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास परळी शहरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
14 मार्च रोजी पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांची जिल्हा रात्रगस्त होती. त्यांचे सोबत सफो 475 ढाकणे पोलीस हेडकॉन्स्टेबल बांगर . दराडे पोना गिते चोपणे चालक पोहे वंजारे असे नाईट पेट्रोलिंग करत परळी शहर येथे आले असता सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमीमिळाली की एक आयशर टेम्पो क्रमांक एच आर 69 डी 23 02 मध्ये राजनिवास गुटख्याचा माल भरलेला असून सदरचा टेम्पो परळी ते गंगाखेड जाणारे रोडवर एन के देशमुख यांचे इंडियन पेट्रोल पंपाचे बाजूला उभा लावून त्यातील माल उतरवत आहेत. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बीड यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाल दोन पंचांना सोबत घेऊन सदर ठिकाणी आज 15 मार्च रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता जाऊन छापा मारला.
या ठिकाणाहून गुटख्याचा माल घेऊन जणारा पिकअप टेम्पो व पोते उचलनरे लोक आम्हाला पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व आयशर टेम्पो व टेम्पो चालक जागीच मिळून आला. त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव साबेर सौंदाना सुन्नी (राहणार सुनेडा तालुका पुनाना राज्य हरियाणा) असे सांगितले. त्याचे ताब्यातील आयशर टेम्पोची पाहणी करताा टेम्पोमध्ये प्रीमियम राज निवास सुग्धी पंमसाला गुटख्याचे 69 मोठे भोत व सुगंधी तंबाखूचे 14 मोठे भोत असा एकूण 33,2, 600 रू गुटक्याचा माल व आयशर टेम्पो किमती 18, लाख रुपये व एक मोबाईल किमती 15000 रुपये असा एकूण 51,36, 600 रुपयांचा माल मिळून आला.
त्यास सदरचा माल कोठून व कोणाकडून आणला व कोणास देणार आहे असे विचारले असता त्याने सांगितलं सदरचा माल इंदोर येथील व्यापाऱ्याकडून आणून परळी येथील व्यापाऱ्यास देणार असल्याचे सांगितले म्हणून त्याचे ताब्यात मिळून आलेल्या टेम्पो व गुटख्याचा माल ताब्यात घेऊन जप्त करून चालक व माल देणार व घेणार असे एकूण आठ आरोपी विरुद सफो मुकुंद शामराव ढाकणे यांचे फिर्यादवरून पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब सहा फौजदार मुकुंद ढाकणे बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, बालाजी दराडे,दिलीप गीते,विकास चोपणे यांनी केली.
Leave a comment