नेकनूर । वार्ताहर
कर्ज फेडण्यासाठी लावलेल्या कांद्याला भाव नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत अडकलेल्या बोरखेड ता. बीड येथील पंचवीस वर्षीय तरुण शेतकऱ्यांने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. संभाजी अर्जुन अष्टेकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
बीड तालुक्यातील लिंबागणेश जवळ असलेल्या बोरखेड येथील संभाजी अर्जुन अष्टेकर वय 25 या शेतकऱ्याने कर्ज असल्याने शेतात 3 एक्कर कांद्याची लागवड केली. यासाठी मोठा खर्चही केला मात्र निघालेल्या कांद्याला पाच रुपयांपेक्षा जास्तीचा भाव नसल्याने घेतलेले कर्ज आता कसे फेडायचे या विचाराने या शेतकऱ्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या कुटुंबात भोळसर भाऊ, विधवा बहीण, वृद्ध आई-वडील असून कष्ट करणाऱ्या या युवकाने आर्थिक विवचनेतून हे पाऊल उचलल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस नाईक सचिन डीडोळ यांनी पंचनामा केला असून नेकनूर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Leave a comment