अशोक शेजुळ हल्लाप्रकरणी आ सोळंके वर गुन्हा सौ सोळंके,टवाणी ही गोत्यात
माजलगाव । वार्ताहर
येथील भाजप कार्यकर्ते व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष, भाजप नेते आडसकर यांचे विश्वासू अशोक शेजुळ यांच्यावर भरदिवसा सहा हल्लेखोरांनी शहरातील शाहू नगर येथे अडवून रॉडणे जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी धुलीवंदनाच्या सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. यात शेजुळ यांचे दोन्ही पाय व दोन्ही हात फ्रॅक्चर तर डोक्याला ही मार लागला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ पाठवले आहे. दरम्यान हा हल्ला आमदार प्रकाश सोळंके समर्थकानी केला असल्याचा आरोप जखमी शेजुळ यांच्याकडून पोलीस जवाबात करण्यात आला होता.
अशोक शेजुळ हे दररोज प्रमाणे आज दि.७ मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पान खाण्यासाठी आले असल्याचे सांगण्यात येते त्या ठिकाणाहून घरी परत जात असताना शाहू नगर येथील मोरेश्वर विद्यालय जवळ पाठलाग करत असलेल्या सहा हल्लेखोरांनी अडवले. त्या ठिकाणी त्यांनी रॉडने अशोक शेजुळ यांच्यावर वार केले, यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी धाव घेतल्यामुळे अशोक शेजुळ बचावले यावेळी शहरातील खाजगी रुग्णालयात प्राथमिक रुग्णालयात उपचार करून छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे उपचारार्थ दाखल केले आहे.
या बाबत पोलिसांनी विचारले असता अशोक शेजुळ यांनी हा हल्ला आमदार प्रकाश सोळंके यांनी केल्याचा आरोप केला . हल्लेखोर हे मला आमदार प्रकाश सोळंकेच्या तक्रारी करतो का ? असे धमकावून रॉडने मारहाण करु लागले, असे सांगीतले. त्यानुसार आ प्रकाश सोळंके,सूतगिरणी चे पदाधिकारी तसेच आ सोळंके यांच्या पत्नी सौ मंगल सोळंके,सूतगिरणी चे पदाधिकारी तथा व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक रामेश्वर टवाणी यांच्यावर ही गुन्हे दाखल करण्यात आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करत आहेत.
शेजुळ यांनी हायकोर्टात केली याचिका दाखल
येथील भाजपचे नेते अशोक शेजुळ यांनी आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदार संघातील विविध संस्थांमधून १६ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे आरोप दि.१५ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध वर्तमान पत्रातून केले होते. त्यानुसार दि.३ मार्च रोजी याचिका ही हायकोर्टात दाखल केली होती
सौ सोळंके,टवाणी ही गोत्यात
आ सोळंके यांच्या पत्नी सौ मंगल सोळंके व उद्योजक रामेश्वर टवाणी सूतगिरणी चे पदाधिकारी असल्यामुळे या राजकीय धुळवडीत गोत्यात आले आहे.
Leave a comment