माजलगाव | वार्ताहर
दोन आठवड्यापूर्वी "जनतेची इच्छा असेल तर भाजप मध्येच काय के चंद्रशेखर राव यांच्या पक्षातही जाईल"असे भाष्य करणारे माजलगाव चे आ प्रकाश सोळंके यांनी अखेर आज तेलंगणाच्या मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली.
नुसती भेटघेऊन आ सोळंके थांबले नसून त्यांनी के चंद्रशेखर राव यांच्यावर स्तुती सुमने उधळणारी पोस्ट देखील सोशल मीडियावर केली.
आ सोळंके यांची पोस्ट
आज तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली.शेतकऱ्यांविषयी असलेले धोरण आणि योजना,मुख्यमंत्री म्हणून तेलंगणा राज्यात विकासात्मक योजनांची आखणी करत देशभर आदर्शवत मुख्यमंत्री आज त्यांचे कौतुक होत आहे.त्यांची काम करण्याची पद्धत, शेतकरी,विद्यार्थी, कामगार,मजूर आणि इतर घटकांविषयी असलेली काम करण्याची म्हत्वाकांक्षा याबाबत सविस्तर चर्चा केली.
तेलंगाणा राज्यात मेडिकल ,इंजिनियरिंग व अन्य उच्च शिक्षणासाठी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना लागणारा खर्च राज्य सरकार करते.महाराष्ट्र राज्याने देखील के.सी.आर यांच्या प्रमाणे शेतकऱ्यांसाठी आणि उद्याचे भविष्य असणाऱ्या तरुणांसाठी ठोस अशी धोरणे आणि योजना करून गतिशील महाराष्ट्रासाठी प्रयत्न करावेत.
Leave a comment